
“मौजे मालेगाव येथे 33 केव्ही उपकेंद्रांचा लोकार्पण सोहळा आ.विजय भांबळे यांच्या हस्ते संपन्न”
जिंतूर-दि.१६/१० /२०१८रोजी मौजे मालेगाव (जि.) ता.जिंतूर येथे आ.विजय भांबळे यांच्या हस्ते ३३ केव्ही उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. वीजेअभावी मालेगाव, डोनवाडा, मानमोडी, जांब (बु.), जांब (खु.), कुडा, सायखेडा या गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी असूनही त्याचा लाभ घेता येत नव्हता. सदर गावे यापूर्वी वरुड उपकेंद्रावर अवलंबून होते जे पुरेसे नव्हते. त्यामुळे ब्रेक डाऊन होणे, वीज पुरवठा खंडित होणे, फ्युज उडणे, विजेचा दाब कमी होणे, यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. परिणामी शेतीस पाणी पुरवठा वेळेत होत नसल्याने उत्पन्न घटून शेतकऱ्यांचे आर्थिक हेळसांड होत होती तसेच गावठाण मध्ये वीज नसल्याने २४ तास गावे अंधारात राहत होत होते. त्यामुळे मालेगाव येथे स्वतंत्र उपकेंद्रासाठी आ.विजय भांबळे यांनी महावितरण ते मंत्रालयापर्यंत सतत पाठपुरावा करून यश मिळविले होते.
मौजे मालेगाव (जि.) ३३ केव्ही उपकेंद्रासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत २ कोटी ७ लक्ष रुपयांची मंजुरी मिळाली व काम पूर्ण झाले. या उपकेंद्राचे लोकार्पण आ.विजयराव भांबळे यांच्या हस्ते आज रोजी संपन्न झाले. सदर उपकेंद्राद्वारे मालेगाव (जि.) परिसरातील अनेक गावांना वीजपुरवठा होणार असल्याने मालेगाव, डोनवाडा, मानमोडी, जांब (बु.), जांब (खु.), कुडा, सायखेडा या गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
या कार्यक्रम प्रसंगी जि.प.सदस्य नानासाहेब राऊत, अजय भैया चौधरी, विठ्ठल घोगरे, पं.स.सभापती मधुकर भवाळे, उपसभापती विजय खिस्ते, रा.कॉ. तालुकाध्यक्ष मनोज थिटे, पं.स.सदस्य गणेशराव इलग, शरदराव मस्के, उपकार्यकारी अभियंता लोणे, सहाय्यक अभियंता डिग्रसकर इत्यादींच्या प्रमुख उपस्थितींसह मालेगाव रा.कॉं. चे प्रमुख आसाराम काळे, माजी सरपंच विश्वनाथ आढे, सरपंच शंकर जाधव, पंडित जाधव, भगवानराव आघव, प्रल्हाद पालवे, रामकिसन पालव, उद्धव कुटे, मनोहर बुधवंत, सतीश राठोड (कुडा सरपंच), उपसरपंच लक्ष्मण आढे, सखाराम गाडेकर, परसराम बहिरट, भगवान घुसळे, रमेशराव घुसळे, किसन आढे, आसाराम घुसळे, भिमराव चव्हाण, संपतराव चव्हाण, सिध्दार्थ चव्हाण, आनंता काळे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.