
जिंतूर:-
पुरेसे मनुष्यबळ आणि आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास राज्यातील सर्वच आरोग्य संस्था सक्षमपणे चालतील तेव्हा ग्रामीण भागातील रुग्णांच्या हिताचा विचार करून राज्य शासनाने राज्यातील एकही आरोग्य संस्था बंद करू नये अशी मागणी महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष अविनाश देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली.
महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना जिल्हा शाखा परभणी यांच्या वतीने दिनांक १५ अकटोबर रोजी परभणी येेेथिल मधुर भोज येेथे *वर्ल्ड फार्मासिस्ट डे* चे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे तर प्रमुख अतिथी व उदघाटक म्हणून आरोग्य सभापती सौ. भावनाताई नखाते, संघटनेचे राज्याध्यक्ष अविनाश देशमुख, प्राचार्य राजन साने, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ रमेश खंदारे उपस्थित होते.
राज्य शासनाच्या वतीने सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी नुकतेच एक परिपत्रक काढून राज्यातील आरोग्य संस्थांची मॅपिंग करून अनावश्यक आरोग्य संस्था बंद करणे विषयी अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात असे म्हटले आहे की, राज्यातील आरोग्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट व ध्येय आहे की राज्यातील नागरिकांना पुरेशी, गुणात्मक, प्रतिबंधात्मक व रोगनिवारक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे .
प्राथमिक आरोग्य सुविधा अधिकाधिक सुलभ होण्यासाठी फिरत्या आरोग्य केंद्रांच्या द्वारे, अॕलोपॕथिक दवाखान्याव्दारे , आयुर्वेदीक दवाखाना ह्या वैद्यकीय संस्था लोकांच्या जास्तीतजास्त जवळ विशेषतः सेवेचा अभाव असलेल्या व दुर्गम जिल्ह्यांमध्ये , तालुकामध्ये कार्यरत आहेत . ज्याचा लाभ तेथील जनतेला होत आहे .भौगोलिक परीस्थिती , दुर्गम रस्ते, साथरोग , हवामानातील बदल विशेषत पावसाळा व उन्हाळा अशा परीस्थितीत अशा संस्था लोकांच्या जास्तीत जास्त जवळ असणे आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे . साथरोग , लसीकरण मोहीमा, अचानक ऊदभवणारे आजार जसे स्वाईन फ्लू, इतादी अशा वेळेस नियमित मनुष्यबळ , जागा तोकडी पडते परीणामी गुणात्मक आरोग्य सेवेवर परीणाम होतो. आयुर्वेदीक , होमीओपॕथी , युनानी अशा चिकीत्सा पद्धतीचा लोकाना लाभ मिळावा म्हणून
एकीकडे केंद्र शासनाने खास आयुष मंञालयाची स्थापना करून आयुष चिकीत्सा पद्धतीचा उत्कृष्ट विकास आणि प्रसार सुनिश्चित करण्यासाठी आयुष विभागाची निर्मिती केलेली आहे. तर दुसरीकडे राज्य शासन राज्यातील आयुर्वेदिक, अलोपॅथिक, युनानी, फिरते पथक बंद करून केंद्र शासनाच्या धोरणाला हरताळ फासत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण पेडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष सोनटक्के, परवेझ सिद्दिकी, मुकरम रौफ, अमर सोळंके, अविनाश कांबळे, सर्जेराव देशमुख यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय पोपळाईत यांनी केले.