जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त व अनिल लोलगे यांची शहर प्रतिनिधी म्हणुन नियुक्ती झाल्या बद्दल सत्कार

सोनपेठ प्रतिनिधी ः
शहरातील जेष्ट पञकार मल्लिकार्जुन सौंदळे , नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त व अनिल लोलगे यांची शहर प्रतिनिधी म्हणुन नियुक्ती झाल्या बद्दल सोनपेठ तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटना , पञकार बांधव व मीञ परिवाराच्या वतीने शनिवारी हनुमान चौक श्री. खंडोबा मंदीर येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, या निमित्त सत्कारमुर्ती यांचा
वृक्ष व ग्रंथ देऊन यथोचीत सत्कार करण्यात आला. या वेळी महेश जाधव,पञकार गणेश पाटील , मल्लिकार्जुन सौंदळे यांनी मनोगत व्यक्त केले, प्रास्ताविक, सुञसंचलन शिवमल्हार वाघे, आभार वृत्तपत्र संघटनेचे तालुकाध्यक्ष रामेश्वर पोटे यांनी मानले.
कार्यक्रमास तालुका पञकार संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गर्जे, पञकार सुग्रीव दाढेल, प्रा. संतोष रणखांब, गजानन चिकणे, माधव जगताप, प्रदिप दलाल, देवानंद सौंदळे, प्रा. भारत राठोड, मुंजाभाऊ डूकरे, दिपक वडकर,सदानंद सौदळे आदींची उपस्थीती होती.