दसरा महोत्सवानिमित्त रावण दहन आ.विजय भांबळे यांच्या हस्ते संपन्न सिने अभिनेत्री अमिषा पटेल यांनी लावली हजेरी अर्चना सावंत यांच्या भरदार लावण्यांनी रसिक

जिंतूरात दहशेरा महोत्सव
जिंतूर :- दि.१८/१०/२०१८रोजी जिंतूर येथे दसरा महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कडून रावण दहन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक जिंतूर सेलू तालुक्याचे लाडके आ.विजयरावजी भांबळे साहेब तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.उज्वलाताई राठोड, न.प. अध्यक्षा सबिया बेगम कपिल फारोकी, व पंचायत समिती सभापती सौ. इंदुमती भवाळे ह्या होत्या. तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसादराव बुधवंत, अजयभैया चौधरी अविनाश काळे, मुरलीधर मते, अभिनय राऊत, विठ्ठल घोगरे, रामराव उबाळे, बाळासाहेब घुगे, नानासाहेब राऊत, विजय खिस्ते, बाळासाहेब भांबळे, मनोज थिटे, शौकत लाला इ. उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कडून नवरात्र महोत्सवात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर रावण दहन कार्यक्रम आयोजित केला गेला. दि.१८/१०२०१८ रोजी वार गुरुवार संध्या. ७:०० जिल्हा परिषद मैदान जिंतूर येथे सिने अभिनेत्री व बॉलीवुड ची सुपरस्टार अमिषा पटेल यांची विशेष उपस्थिती लावत प्रेक्षकांची मने जिंकली.. तर तरुण वर्गासाठी आकर्षण असणारा सिने तारका लावणी सम्राज्ञी अर्चना सावंत व संच यांनी दिमाखदार लावणी शो सैराट यांच्या खणखणीत लावण्या व आयटम सॉंग मधून प्रेक्षक मंत्रमुग्ध केले. स्टेज वर लावण्यांचा कार्यक्रम चालू असताना १० हजाराच्या वर प्रेक्षक देखील लावणी च्या तालावर ठेका धरत होते.
यावेळी नगर सेवक मनोहर डोईफोडे, रामराव उबाळे, श्यामराव मते, दलमीर पठाण, शाहेद बेग मिर्झा, शोएब जानिमिया, आहेमद बागबान, बाळू जाधव, दत्ता काळे, शेख इस्माईल, शेख उस्मान खा पठाण इ. कार्यक्रमास उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन अड. विनोद राठोड यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर मते यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजी नव्हाट, अर्जुन डोईफोडे, संदीप राठोड, पिणु काळे, निजाम काझी, शाहेद सिद्धिकी यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व स्वंयसेवक यांनी काम पाहिले.
यांचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी जिंतूर तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती आयोजक प्रसादराव बुधवंत (विधानसभा अध्यक्ष जिंतूर सेलू), मनोज थिटे (तालुकाध्यक्ष रा.कॉं. जिंतूर), शहराध्यक्ष शौकत लाला यांनी केले आहेे