जिंतूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा——सुरेश नागरे प्रशासनाने दिरंगाई न करता योग्य आणेवारी जाहीर करावी

जिंतूर—–सध्या जितूर तालुका दुष्काळाच्या गर्द छायेत असून परतीचा पाऊस सबंध तालुक्यात परतलाच नसल्याने सबंध जिंतूर तालुका दुष्काळाच्या झळा सोसत असून शासनाने विना विलंब सबंध तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा अशी मागणी भाजप युवा नेते सुरेश कुंडलीकरव नागरे यांनी केली आहे जिंतूर तालुका हा डोंगळा भागात येतो व तालुक्यात रोजगार पुरवेल अशी कोणतीही कारखानदारी तालुक्यात नाही आणि दुदैवाने या वर्षी सुरवातीस जरी पाऊस बऱ्यापैकी पडला तरी त्यात शेवट पर्यंत सात्यत नव्हते व महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांची परतीच्या पावसा वर सर्व मदार असतांना टाळूक्यात परतीच्या पावसाने कायमची हुलकावणी दिल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाला असून खरिपाची पिके आवश्यक प्रमाणात पावसा अभावी घेतल्या जाणार नाहीत या वर्षी पाऊसाची टक्केवारी कमी प्रमानात होती पिकांची आणेवारी सरासरी 45 टक्केच्या आसपास असल्या मुळे मूग उडिद सोयबिन ही दसरा दिवाळी साजरी करणारी शेतकऱ्यांची कमी वेळात हातात येणारी पीक समाधान कारक झाली नाही दरवर्षी प्रमाणे येणारा उतारा अत्यल्प होती आला आहे परिणामी शेतकरी चिंताग्रस्त आहे
कापूस तूर सदर पिके सुरवातीस चांगली वाढ होऊन पण दुर्दवाने परतीचा पडलाच नसल्या मुळे सदर पिके असून नसल्यात जमा असल्याची खंत नागरे यांनी केली
शासन व शेतकरी यांचा दुवा असलेले तहसीलदार तलाठी कृषी सहायक यानी शासन आदेश येताच पिकाची योग्य पाहणी करून तात्काळ योग्य अहवाल त्वरित दिरंगाई न करता पीक पाहणीची कामे करावी अशी मागणी केली आहे
सॅटेलाईट द्वारे पिकाची पाहणी अहवाल बाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत असे नागरे यांनी सांगितले की सदर यंत्रणेद्वारे पिकाची पाहणी सर्वाना न्याय देता येईल असे शक्य नसल्याचे असे सांगून त्या वर सुरेश नागरे यांनी आक्षेप घेतला आहे कारण सॅटेलाईट नुकसानाची पाहणी मुळे शेतकरी शासना पासून मिळणाऱ्या सवलती पासून वंचीत राहील असे सांगितले कमी पावसामुळे तालुक्याचे भूषण एलदरी डॅम मध्ये 7 ते 8 टक्केच पाणी साठा आहे आणि ही बाब पुढील विविध बाबी साठी गंभीर इशारा असल्याचे सांगून शासनाने या बाबत कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे तालुक्यात उन्हाळा पूर्वीच ग्रामीण भागात तीव्र पाणी टचाइ आता पासून भासत आहे त्या साठी शासनाने पाण्याचे टँकर सह महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून द्यावी परिणामी ग्रामीण भागातील कामगार वर्ग गावातच हाताला काम उपल्ब्ध झाल्याचे तालुक्यातील स्त्री पुरुष शहरा कडे कामा साठी स्थलांतरीत होणार नाही अशी मागणी रेटली आहे शेवटी असेही स्पष्ट केली की तलाठी कृषी सहायक यांनी घरात बसून सर्व्हे न करता चिताग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जागा मोक्यावर नुकसान भरपाई अहवाल द्यावा अशी अपेक्ष्या सुरेश नागरे यांनी प्रशासना कडे व्यक्त केली आहे
सदर सर्व विषय दिनांक 19 आकटोम्बर ला सेलू येथील एका कार्यक्रमात ना पाणी पुरवठा मंत्री व परभणी जिल्ह्याचे सम्पर्क मंत्री बबनराव लोणीकर याच्याशी सुरेश नागरे यांनी जिंतूर तालुका तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करण्या बाबत विनाविलंब पावले उचलावीत असे साकडे घातले