Breaking News

*झी-मराठी सा-रे-ग-म-प महगायक यज्ञेश्वर लिंबेकर यांच्या भावगीत व गझलांसह रंगणार शब्दसह्याद्री’चा काव्यजागर!*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 


जिंतूर :
दरवर्षीप्रमाणे याहि वर्षी जिंतूर शहरामध्ये कोजागिरी पोर्णिमेनिमित्त शब्दसह्याद्री प्रतिष्ठान जिंतूर समन्वयातून काव्यजागर रंगणार असून झी मराठी वाहिनीवरील सारेगमप या स्पर्धेचे विजेते महागायक यज्ञेश्वर लिंबेकर यांच्या गझल व भावगीते ऐकण्याची मेजवानी जिंतूर शहरातील रसिकांना मिळणार आहे.

शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, जिंतूर च्या वतीने कोजागिरी पोर्णिमेनिमित्त मागील तीन वर्षांपासून जिंतूर शहरातील रसिकांसाठी काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी महाराष्ट्रातील नामवंत कवी चिञपट गीतकार डॉ. विनायक पवार, डॉ. मुकुंद राजपंखे, प्रा. कल्याण कदम, अरुण पवार, अविनाश भारती, प्रकाश होळकर, केशव खटींग, प्रकाश घोडके, विष्णू थोरे, प्रभाकर साळेगावकर, अण्णा जगताप आदिंनी शब्दसह्याद्री’च्या काव्यमैफिलीस हजेरी लावलेली आहे.

कोजागिरी पोर्णिमेनिमित्त ऑर्किडस इंग्लिश स्कूल परिसर येथे सायंकाळी 7 वा आयोजित या संगीत मैफिलीचा शहरातील रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शब्दसह्याद्री प्रतिष्ठान, जिंतूर च्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close