Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिंतूर तालुक्यातील वस्सा, आडगाव, सावंगी (म्हा)व वरुड सर्कलचे बूथ बांधणी शिबीर आ.विजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न” बूथ कमिटीत तरुण युवक व युवतींना प्रमुख स्थान द्या- आ.विजय भांबळे

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

जिंतूर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या बूथ बांधणी शिबिरास तालुक्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या निवडणुकीस पक्षाचे श्रेष्ठत्व वाढवण्यासाठी व येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोलाची भूमिका ठरवण्यासाठी पक्षाचा मूळ पाया म्हणजे बूथ बांधणी आ.विजय भांबळे याने सुरू केली आहे. निवडणुकीत प्रत्येक गावात बूथ निहाय तरुण तडपदार युवक व युवतींची नवीन फॊज तयार करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व जाती धर्माना समान न्याय देत बूथ कमिटीत स्थान द्यावे, त्याचबरोबर महिला व युवतींना देखील मोलाचे स्थान द्या असे प्रतिपादन आ.विजय भांबळे यांनी केले.
देशात व राज्यात भाजप चे सरकार असून देशात गॅस, पेट्रोल, डिझेल चे भाव वाढले असून देशाची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे, शिवसेना भाजप सरकार महागाई नियंत्रित करण्यास हातबल झाले असून या सरकारला जनता येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही, त्यासाठी आपण देखील मतदारांमध्ये जनजागृती करून सरकारचे अपयश जनतेसमोर मांडले पाहिजे.
या बूथ बांधणी मेळाव्यात मार्गदर्शन करताना आ.विजय भांबळे म्हणाले की, निवडणुकी दरम्यान भूलथापा, जातीचे राजकारण, विकास कामना बगल देणाऱ्या नेत्यांचा उत येऊन मतदारांना भूल दिली जाते अश्या फसव्या नेत्यांपासून वेळीच जनतेला सावध करण्यासाठी राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुण तडफदार युवकांनी पुढे येऊन फसव्या राजकारण्याणंचे मनसुभे उधळून लावले पाहिजेत.
जिंतूर तालुक्याचा विकास गेली पंचवीस वर्षापासून धूळ खात पडला होता, अनेक माजी आमदारांच्या गावचे देखील रस्ते माझ्याच कारकिर्दीत पूर्ण होत आहेत. त्यामुळे माझ्या कारकिर्दीतील विकास सांगायची गरज नाही असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला. येणाऱ्या निवडणुकीत जिंतूर-सेलू तालुक्यातून भाजप-सेनेला मुळासगट उपटून बाहेर फेकले पाहिजेत.
जिंतूर तालुक्यातील बूथ बांधणी मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून दि.२०/१०/१८ रोजी आडगाव व वस्सा सर्कलचा तर आज २१/१०/१८ रोजी सावंगी म्हा व वरुड सर्कल चा बूथ बांधणी मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्या प्रसंगी विश्वानाथ राठोड, प्रसादराव बुधवंत, अजय चौधरी, नानासाहेब राऊत, अविनाश काळे, अभिनय राऊत, बाळासाहेब घुगे, विठ्ठल घोगरे, रामराव उबाळे, ता.अ.मनोज थिटे, शरदराव अंबुरे, सभापती मधुकर भवाळे, उपसभापती विजय खिस्ते, पस सदस्य किरण दाभाडे, भवरे, दिलीप डोईफोडे, गणेशराव इलग यांच्यासह सर्कल मधून गावनिहाय सरपंच, उपसरपंच, पक्षाचे पदाधिकारी, व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close