Breaking News

*सख्ख्या भावानेच मुलाच्या मदतीने भावाचा खून* *दोन गंभीर जखमी*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्याच्या गुन्हेगारी पातळीत वाढ झाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.तालुक्यातील कन्हेगाव येथील डोबाडी तांडा वसाहतीवर सख्या भावानेच खून भावाचा मुलाच्या मदतीने खून केल्याची घटना 22 अक. रोजी घडली आहे.याबाबत अधिक माहीती अशी की,काही दिवसापूर्वी मयत नागनाथ सखाराम भोसले याच्याकडे घरगुती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमात भोसले यांनी त्यांचा जावई धीरज पवार यास कार्यक्रमासाठी बोलावले होते.धीरज पवार यांच्याशी आरोपी नायल सखाराम भोसले,कन्हैय्या नायल भोसले,प्रकाश नायल भोसले यांचा पूर्वीचा वाद होता.यातच घरगुती कार्यक्रमास मयत नागनाथ यास तू जावयास कार्यक्रमास का बोलावले म्हणून शिवीगाळ करत कुह्राडीने मारहाण करण्यास सुरुवात केली तेव्हा मयत याची पत्नी छाया नागनाथ भोसले ही व तीची मुलगी भांडण सोडवण्यास गेली असता.नागनाथ यास दोघींनाही जबर मारहाण झाल्याने त्या दोघी जमीनीवर कोसळल्या त्यानंतर मयत यास जास्त मारहाण करत त्याचा जागीच खून करण्यात आला आहे.सोनपेठ पोलीसात छाया नागनाथ भोसले रा.कान्हेगाव हिच्या फिर्यादीवरुन आरोपी नायल सखाराम भोसले,कन्हैय्या नायल भोसले,प्रकाश नायल भोसले सर्व रा.डोबाडी तांडा यांच्याविरुद्ध भा.द.वी.कलम ३०२,३२६,३२५,३२४,३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल झाला असून मयताची पत्नी छाया नागनाथ भोसले व मुलगी यांची पृकृती गंभीर असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.सदर गुह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात येऊन न्यायालयासमोर उभे केले असता.त्यांना २६ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली या गुह्यातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध चालू असल्याचे तपासधिकारी पोलीस निरीक्षक सोपान सिरसाठ यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close