Breaking News

संभाजी ब्रिगेडचे नववे राज्यस्तरीय अधिवेशन कोकणात हार्दिक पटेल यांची उपस्थिती ; सहभागी होण्याचे बालाजी शिंदे सोसकर यांचे आवाहन

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

जिंतूर :-
मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे नववे राज्यस्तरीय अधिवेशन २७ व २८ आक्टोबर रोजी अलिबाग येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
मराठा आरक्षणासह मराठा – बहूजन समाजाच्या विविध हक्क अधिकारासाठी आक्रमकपणे लढा देणारी संघटना म्हणून संभाजी ब्रिगेडची ओळख आहे भुतकाळाचं आकलन करून वर्तमानाशी भिडण्याचं धैर्य व भविष्याचा अचूक वेध घेण्यासाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय चालणा-या या अधिवेशनात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली खा.छत्रपती संभाजीराजे भोसले, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, हार्दिक पटेल, आ.जिंतेद्र आव्हाड, सुनिल तटकरे,आ.हसन मुश्रीफ,आ.जयंत पाटील,यांच्या सह अनेक साहित्यिक, विचारवंत, व नामवंत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील बलाढ्य संघटनेचे अधिवेशन होत असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
या अधिवेशनात मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर यांनी केले आहे..

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close