Breaking NewsSONPET

ग्राहकांमध्ये आपल्या अधिकाराबाबत जागरुकता गरजेची- न्या.अनुराधा सातपुते

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

परभणी,दि. 25 : ग्राहकांमध्ये आपल्या अधिकाराबाबत जागरुकता येणे गरजेची असून यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. आपल्या अडचणींबाबत ग्राहकांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितल्यास त्यांना न्याय मिळेल असे प्रतिपादन मंचाच्या अध्यक्षा न्यायमुर्ती अनुराधा सातपूते यांनी केले.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य व अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी न्या.सातपुते बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती सुकेशिनी पगारे, ग्राहक न्याय मंचाच्या सदस्या ॲड श्रीमती किरण मंडोल, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक पाटील, वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक का.व्य.पाटील आदी उपस्थित होते. प्रशिक्षणाचे आयोजन केंद्र सरकारच्या जागो ग्राहक जागो मोहिमेअंतर्गत करण्यात आले होते.
न्या.सातपुते म्हणाल्या, ग्राहकांच्या हित रक्षणासाठी कायद्याने 6 अधिकार प्रदान केले आहेत. यातून त्याला मिळणारी वस्तू व सेवा योग्य मिळावी अशी अपेक्षा आहे. याबाबत अडचण आल्यास तो जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करु शकतो. 5 लाख रुपयांपर्यंतच्या तक्रारी दाखल करण्यासाठी कोणतेही शुल्क अथवा फि नाही तसेच यासाठी तो वकिलामार्फत न येता थेट अर्ज दाखल करु शकतो.
त्या पुढे म्हणाल्या, ग्राहकांना वस्तू खरेदी सेवा आदीच्या व्यवहारांमध्ये योग्य मोबदला न मिळाल्यास ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यवाही करुन संबंधित सेवा पुरवठादार अथवा व्यापारी आस्थापनांवर दंड अथवा शिक्षेची कारवाई करते. घर खरेदी, वैद्यकीय सेवा, अन्न पदार्थ, पेय अशा दैनंदिन बाबीमध्ये ग्राहकांने जागरुक होऊन आपल्या तक्रारी मांडण्यासाठी निर्भयतेने मंचाकडे येणे गरजेचे आहे. असे न्या.सातपुते यांनी सांगितले.
जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती पगारे यांनी केरोसीन मिळण्यासाठी हमीपत्र देणे आवश्यक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करु शकतात. त्यांचे मार्गदर्शन व प्रबोधन करण्याची जबाबदारी सदस्यांनी हाताळलयास ग्राहक मंचावरील ताण कमी होईल असे श्रीमती पगारे म्हणाल्या.
यावेळी सहायक नियंत्रक श्री पाटील यांनी विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच विवेक पाटील यांनी अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी, ई-पॉसचा वापर, रेशन कार्डचे डिजीटायझेशन याबाबत सांगितले. सुत्रसंचालन अमोल होळंबे यांनी केले. यावेळी महसूल संघटनेचे अध्यक्ष नाना भेंडेकर, सचिन भिसे, ग्राहक परिषदेच्या सदस्या सुरेखा दराडे, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close