Breaking News

प्रमोद भालेराव ६०० किमी ब्रेवेट सायकल स्पर्धेत अव्वल * फ्रांस देशाकडून आयोजित केली होती स्पर्धा * वाशिम-नागपूर-वाशिम सायकल प्रवास ३८ तासात केला पूर्ण

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील साईबाबा प्राथमिक विद्यालयातील ५२ वर्षीय प्रमोद भालेराव शिक्षकाने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक हिताच्या प्रश्नांची उकल तसेच आरोग्यविषयक संस्कृती रुजावी म्हणून वाशिम येथे फ्रांस देशाकडून आयोजित करण्यात आलेल्या वाशिम-नागपूर-वाशिम ६०० किमी ब्रेवेट स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम प्रयासात अवघ्या ३८ तासात स्पर्धा पूर्ण करून अव्वल येण्याचा मान मिळवल्याने त्यांचे येलदरी येथे सायकल समूहाच्या वतीने गौरव करण्यात आले आहे.
दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. सोबतच शहराचे प्रदूषण, तापमाण वाढत आहे. याशिवाय वाहनांची वर्दळ आणि पार्किंगचाही त्रास सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. त्यातच वाढत्या इंधनाच्या दरापासून पर्यायी मार्ग म्हणून व भविष्यकालीन आरोग्याचे संकट कमी करण्यासाठी येलदरी येथील साईबाबा प्राथमिक विद्यालयातील शिक्षक प्रमोद काशीराव भालेराव यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व मानसिक प्रगतीला प्रथम स्थान देऊन कर्तव्य बजावले. मात्र मागील वर्षी त्यांना दुचाकी अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सलग दोन तीन महिने आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागले. म्हणून तेव्हापासून त्यांनी निर्धार करून एक सायकल विकत घेऊन दररोज सायकल चालविण्याचा सराव केला आणि विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची गोडी लागावी तसेच सामाजिक व आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी वाशिम येथे आयोजित करण्यात आलेल्या ब्रेवेट सायकल स्पर्धेत 200 किमीची सायकल स्पर्धा यशस्वी पूर्ण करून क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आणि इथेच न थांबता शनिवार २७ ऑक्टोबर रोजी वाशिम येथे फ्रांस देशाकडून आयोजित करण्यात आलेल्या ६०० किमी ब्रेवेट सायकल स्पर्धेत सहभाग नोंदवला. सुरुवातीस या स्पर्धेकरिता नऊ सायकल पट्टू सामील झाले होते. नंतर वाशिमच्या सात स्पर्धकांनी अर्ध्यातच स्पर्धेतून माघार घेतली. मात्र ४० तासाच्या या सायकल स्पर्धेत प्रमोद भालेराव यांनी मोठ्या हिमतीने वाशिम-नागपूर-वाशिम ६०० किमीचे अंतर अवघ्या ३८ तासात पूर्ण केल्याने स्पर्धेत त्यांना अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे जिंतूर तालुक्याचा नावलौकिकात आणखीन भर पडली आहे. म्हणून त्यांच्या ह्या यशाचे कौतुक करण्यासाठी जिंतूर व येलदरी येथील सायकल प्रेमींनी त्यांचा गौरव केला आहे. याप्रसंगी त्यांचे सहकारी सुधाकर संघवार, डॉ. सुमेर  मोहारे, दिलीप लोखंडे, रमाकांत जैस्वाल यांच्यासह शहरातील सायकलप्रेमी व्यकटेश भुरे, देवेंद्र भुरे, शहेजाद खान यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close