Breaking News

शहराध्यक्ष पदी मोसीन खान यांची निवड

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

जिंतूर:-
जिंतूर येथील मोसीन खान यांची रविवार 28 ऑक्टोबर रोजी आयोजित मनसे पदाधिकारी बैठकीत जिल्हाध्यक्ष शेख राज यांच्या उपस्थितीत मनसे शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक शासकिय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला मनसे जिल्हा अध्यक्ष शेख राज, उपजिल्हाअध्यक्ष गुलाब रोडगे, जिंतुर तालुका अध्यक्ष सुखदेव सोळंके, सेलू शहर अध्यक्ष गणेश निवळकर, जैस्वाल, हे सर्व उपस्थित होते. यावेळी शहरातील मोसीन खान यांची जिंतूर शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी रामा काळे यांची निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close