Breaking News

*श्री महालिंगेश्वर विद्यालयात गोवर रूबेला विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]
  1. *श्री महालिंगेश्वर विद्यालयात गोवर रूबेला विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न*

सोनपेठ (प्रतिनिधी)

बहुचर्चित गोवर रूबेला या आजारा विषयी शालेय विद्यार्थ्यांत जागरूकता निर्माण करण्यासाठी सोनपेठ प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने येथील श्री महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गोवर रूबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दि. ३०ऑक्टोबर रोजी एकदिवशीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मन्मथ महाजन यांनी या आजारा विषयी सविस्तर माहिती देऊन गोवर व रूबेला या आजाराचे स्वरूप, त्याचे होणारे दुष्परिणाम, देशातील या आजाराची सद्य स्थिती व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण आदीविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. गोवर व रूबेला या आजारांना प्रतिबंध करणारी लस, तिचे स्वरुप व सुरक्षितता, लसीकरणाची कार्यपद्धती व या लसीचे महत्त्व विषयीही सखोल मार्गदर्शन केले. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डि.आर.गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली पारपडलेल्या या शिबिरास
वैद्यकीय अधिकारी डॉ. मन्मथ महजन, आरोग्य सहाय्यक अशुतोष डुबे, औषध निर्माते शेख आलीम आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक कालिदास मस्के यांनी. या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close