औरंगाबादच्या ब्रेवेट स्पर्धेत जिंतूरचे सायकल पट्टूची चमकले * औरंगाबाद-नगर-औरंगाबाद 200 किमी अंतर यशस्वी पूर्ण *चार सायकल पट्टूने नोंदवला होता सहभाग

जिंतूर:-
जिंतूर व येलदरी येथील चार सायकल पट्टूनी औरंगाबाद येथे फ्रांस देशाकडून गुरुवार 1 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या 200 किमी ब्रेवेट सायकल स्पर्धेत चार सायकल पट्टूनी औरंगाबाद-अहमदनगर-औरंगाबाद हा सायकल प्रवास अवघ्या 12 तासात पूर्ण करून मराठवाड्याची राजधानी येथे जिंतूरचे नाव चमकीवले आहे. त्यांच्या या अद्वितीय यशामुळे त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
शहर व परिसरात वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुदृढ शरीर संपत्ती निर्मिती करण्याकरिता तसेच नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी जिंतूर शहर व येलदरी येथील सायकल पट्टू मागील एक वर्षापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. एवढेच नव्हे तर यामधील सायकल पट्टूनी विदर्भातील वाशिम येथे फ्रांस देशाकडून आयोजित करण्यात आलेल्या 200, 600 सायकल स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवत स्पर्धेत घवघवीत यश मिळवून तालुक्याचा नाव जगाच्या पाठीवर कोरला आहे. आणि त्यातच गुरुवार 1 नोव्हेंबर रोजी मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे आयोजित 200 किमी ब्रेवेट स्पर्धेत जिंतूरच्या चार सायकल पट्टूनी सहभाग घेत औरंगाबाद-अहमदनगर-औरंगाबाद हा साडे तेरा घंट्याचा सायकल प्रवास अवघ्या बारा तासात यशस्वी पूर्ण करून औरंगाबाद येथे जिंतूरचे नाव चमकीवले आहे. सदरील स्पर्धेत संबंध मराठवाड्यातून 20 स्पर्धक आले होते. यात शहरातील व्यंकटेश भुरे, प्रमोद भालेराव, दिलीप लोखंडे, शहेजाद खान चार सायकल पट्टूनी वेळेच्या आत येऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे देवेंद्र अण्णा भुरे, रमाकांत जैस्वाल, सुधाकर संघवार, डॉ. सुमेर मोहारे यांनी त्यांचा गौरव केला आहे. य