*आपुलकी,स्नेह व अनुभवाची शिदोरी देऊन वर्गमित्रांनी साजरा केला सोहळा** #28 वर्षांनी झाली भेट, # # 1990 च्या वर्गमित्रांचा भरला वर्ग #

जिंतूर ;- स्नेह ,आपुलकी, व जिव्हाळा जपत तब्बल28 वर्षानी वर्गमित्रांनी अनुभवाची शिदोरी देऊन साजरा केला वर्गमित्राच्या आठवणींचा सोहळा सोबत धमाल गाणी,
फिशपॉंड,गेम शो, व परिचयातून मिळवला सुखद अनुभव
जिंतूर येथे 1990 शालेय व 1992 महाविद्यालयीन वर्ग मित्राचा सोहळा येथील सोनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये11 नोव्हेंबर रोजी पार पडला, वर्गमित्रांचे औक्षण, गुलाब पुष्पानी स्वागत, व भव्यदिव्य रांगोळी या मुळे वर्गमित्र भारावून गेले, सकाळच्या सत्रात दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली ,प्रथम वर्गमित्रांचा परिचय पार पडला. वर्गमित्राच्या परिचयातून निर्माण होणारे विनोद टाळ्या घेऊन गेले,दुपारच्या सत्रात विशाखा रूपल नांदगावकर ( औरंगाबाद) यांनी धमाल गाणी गायली सोबत वर्गमित्रांनी सहभाग नोंदविला गेम शो मध्ये विचारलेले प्रश्न व दिलेली उत्तरे या तुन अनेक विनोद निर्माण झाले, सर्वांच्या आवडत्या फिस्पॉंड कार्यक्रमाने महाविद्यालयीन आठवणींनाउजाळा दिला,
सायंकाळी गुरुगौरव सोहळा या साठी वर्गमित्र आमदार विजय भांबळे, माजी मुख्याध्यापक डी. एम. शेप, के. डी. वटाणे ,प्रा प्रभाकर वजीर आदींची उपस्थिती होती या वेळी28 वर्षांपूर्वीच्या 25 गुरूचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्गमित्रानि सहकार्य केेेेले
** कर्मविराचा सत्कार**
मागील25 वर्षांपासून सतत संघर्ष करून कुटूंब सावरणार्या विश्वनाथ हळदे, व हलाखी च्या परिस्तिथीवर मात करत मोलमजुरी व शेती करून तीन मुलांना अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या माणिक शेद्रे या दोन कर्मवीर वर्गमित्रांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला