डॉ माधवराव सानप प्रतिष्ठान च्या वतीने*जिंतूर – सेलू विकासाचे वास्तव:- लोक परिसंवाद*

*जिंतूर – सेलू विकासाचे वास्तव:- लोक परिसंवाद*
डॉ माधवराव सानप प्रतिष्ठान च्या वतीने दि 13/11/18 रोजी डी. एस. एम. कॉलेज जिंतूर येथे जिंतूर – सेलू :- विकासाचे वास्तव यावर विषयावर लोक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, या परिसंवादामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे ज्येष्ठ व नामवंत साहित्यिक प्रा फ मु शिंदे, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ माधवराव सानप व श्री शाहूरावजी गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ माधवरावजी सानप साहेब यांनी केले, त्यांनी प्रास्ताविकामध्ये जिंतूर सेलू विकासाचे वास्तव यावर बोलतानी सांगितले की, मुळात “विकास” म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. विकासाची नेमकी व्याख्या करणे तसे अवघड आहे. कारण विकासाची व्याप्ती फार मोठी असून ती अनेक क्षेत्राशी संबंधित आहे.
फक्त रस्ते, इमारती आणि पूल या क्षेत्रामध्ये झालेल्या विकासाला विकास म्हणता येणार नाही तर कला, साहित्य, क्रीडा, आरोग्य, विज्ञान, शेती तसेच सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक या सर्व क्षेत्रामध्ये समतोल विकास होणे अत्यंत गरजेचे आहे.. विकासाची फळे लोकांना उपभोगता आली पाहिजेत व त्यातून त्यांना समाधान व आनंद मिळाला पाहिजे. आपापल्या गावात नांदणे व जीवन जगणे आनंददायी वाटले पाहिजे त्याहीपेक्षा पुढे जाऊन वर्तमानातील सर्व गरजा भागवून आशा-आकांक्षा पूर्ण करत असतानाच भावी पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला कुठलीही बाधा येऊ न देता त्यांच्या साठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून ठेवणे यालाच कदाचित “शास्वत विकास” म्हणता येईल…
विकासाचे साधारणपणे भौतिक विकास, सामाजिक व मनोवृत्तीय विकास व सांस्कृतिक विकास असे वर्गीकरण करता येईल असे सांगितले. प्रभावी विचाराने सामाजिक गटाच्या मनोवृत्तीमध्ये लक्षणीय बदल घडवून आणता येतो हे त्यांनी आपल्या पोलिस पोलिस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याद्वारे पटवून दिले… गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्या, बाबरी मशीद प्रकरण, एक गाव एक गणपती, सलोखा संकल्प व तंटामुक्त गाव योजना याद्वारे लोकांच्या मनोवृत्तीमध्ये लक्षणीय बदल घडून आणल्याचे उदाहरणाद्वारे त्यांनी सांगितले. जिंतूर सेलू भागातील संख्याशास्त्रानुसार मोजता येणाऱ्या विकासाची आकडेवारी सादर करून देशाच्या व महाराष्ट्राच्या तुलनेत आपला भाग कसा मागे आहे हे आकडेवारीनुसार सिद्ध करून दाखविले.
ज्येष्ठ साहित्यिक फ मु शिंदे यांनी साहित्यिक भाषेत विकास म्हणजे काय हे पटवून दिले… त्याचबरोबर आपल्या प्रसिद्ध आई कवितेद्वारे उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
लोक परिसंवाद कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला, साहित्य, क्रीडा, विविध संघटना, कर्मचारी, व्यवसायिक, कायदा व शेती या सर्व क्षेत्रातील व विकासात स्वारस्य असणारी जिंतूर – सेलू भागातील सुजान नागरिक मोठया उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा अनिल काळे अनिल काळे यांनी केले तर प्रा डॉ विकास पाटील, श्री,के सी घुगे, श्री मारुती घुगे यांनी परिसंवादामध्ये आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ माधवराव सानप प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले