Breaking News

परभणी जिल्ह्यात विकास कामात दिवाळी मागण्याची प्रथा अशोभनीय—-ना लोणीकर सुरेश नागरेच्या स्नेहमिलन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

जिंतूर:-

जिंतूर—–विकास कामात राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र आलेच पाहिजे पण दुर्दैवाने आज घडीला परभणी जिल्ह्यात लहान मोठे विकास कामात अडथळे आणत त्या बाबत दिवाळी मागण्याची प्रथा अशोभनीय असल्याची टीका परभणीचे सम्पर्क मंत्री ना बबनराव लोणीकर यांनी केली ते जिंतूर येथे आयोजित दीपावली स्नेहमिलन निमत्रीत कार्यक्रमात सत्कारास उत्तर देताना बोलत होते तत्पूर्वी त्यांच्या उपस्थिती जिंतूर परभणी या सुरू असलेल्या चौपदरी रस्त्याच्या कामाचे उदघाटन केले सदर स्नेह मिलन कार्यक्रमात ना लोनीकरणांनी केंद्र आणि राज्यातील सरकार जनहीताचे हजारो कोटीचे कामे करत आहे वाटुर जितूर या कामा साठी लवकरच पैसे पडणार असून या चौपदरी करणाचे काम मार्गस्थ लागणार असून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून आपल्या कडे 5000 कोटीच्या कामाची मंजुरी दिलेली आहे मी स्वतः निवडणुकीत पैसे दारू वाटत नाही विकास कामे करतो निवडून येतो मंठा जिंतूर या तालुक्यातील कांही गावे दुष्काळ ग्रस्त मंजूर करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री यांनी केंद्रा कडे दुष्काळग्रस्ता साठी 7000 कोटीच्या मागणीचा ठराव पाठवलेला असून शेतकऱ्यांना आपले शासन वाऱ्यावर सोडणार नाही सेलू साठी रेमंड टेक्स्टाईल आणण्यासाठी प्रयत्न केले सेलूला आवश्यक 200 एकर जमीन तेथे उपलब्ध नसल्या मुळे जितूर साठी रेमंड टेक्सटाईलचा विचार केला जाऊ शकतो कारण जितुरात गायरान जमीन मोठ्या प्रमानात उपलब्ध आहे सेलू जितूर काही वेगळे नाही कारण असे जर झाले तर शेतकरी बाधवाचा कोट्यवधींचा कापूस येथेच खरेदी केला जाईल व कुशक अकुशल रोजगर उपलब्ध होऊन बेकाराना स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल

सुरेश आपण कामाला लागा शासन आपल्या पाठीशी—-नामदार लोणीकर
सदर दीपावली स्नेह मिलनाच्या कार्यक्रमात आयोजित कार्यक्रमाचे कौतुक करत लोणीकर यांनी सुरेश नागरे याना आपण आता कामाला लागा मी स्वतः व शासण आपल्या पाठीशी असेल असा शब्द भर कार्यक्रमात देत या पूढे आपण तालुक्यात वॉटर ग्रीडला चालना देत ग्रामीण भागात पुढाकार घेऊन आवश्यक जास्तीत जास्त ग्रामपंचायतीचे ठराव ना हरकत घेऊन माझ्या कडे या 100 ते 150 कोटी रु शासना कडून उपलब्ध करून देण्याची मी आपणास हमी देतो असा शब्द लोणीकर यांनी भर कार्यक्रमात दिला आपण वॉटर ग्रीडच्या माध्यमातून शुद्ध 10 रु 1000 ली पाणी देऊ शकतो अशी सविस्तर माहिती पण लोणीकर यांनी दिली आपण आता पासून कामाला लागा कारण मला स्वतःला 300 गावाची पाहणी करायला 9 महिने 9 दिवस लागल्याचे सांगितले
या कार्यक्रमात सुरेश नागरे यांनी सुद्धा उपस्थित जनसमुद्यास भावनिक साद घालत मी जीवनात दिवगंत स्व नागरे यांच्या पावला वर पाऊल टाकत जीवनात फक्त आणि फक्त समाजकारण करेल समाजसेवेचा वारसा जपत कोणाचेही वाईट न चितता कोणाचेही जे चांगले काम करता येईल जे जे माझ्या कडून घडेल ते कामे करण्याचा व वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न जीवनाच्या शेवटच्या क्षणा पर्यत प्रयत्न करेल अशी भावनिक साद त्यांनी आपल्या भाषणात विषद केली
सुरेश नागरे यांनी आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमास ना बबन लोणीकर या सह विनोद बोराडे गणेश रोकडे विशाल बुधवन्त सुरेश भुमरे विजय रमेश इलग राजेश वटमवार लक्ष्मण बुधवत विजय तापडीया ब्रिजगोपाल तोष्णीवाल रमेश दरगड सत्यनारायण शर्मा हाशम भूरी कोकडवार काकडे डॉ गणपत वाघमारे सौ आशाताई गायकवाड उपजिल्हाधिकारी गुलाब गावंडे सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी व्यापारी पत्रकार सर्व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते या कार्यकृमाचे सूत्रसंचालन गजानन कुटे यांनी केले या स्नेह मिलन कार्यक्रम यशस्वीते साठी डॉ निशांत मुंढे बी एस नागरे डॉ टाकरस दाजी विभूते नगरसेवक संतोष आंधळे बंटी निकाळजे टीका खान पठाण अनता वाकळे ताहेर भाई वाजीद आदींनी अथक परिश्रम घेतले

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close