Breaking News

* पाणी प्रश्नःन सुटला , दुधना प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले पाणी * कांतराव देशमुख यांच्या मदतीला धावून आले मंत्री मोहदय दिवाकर रावते

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

जिंतूर

अकबर सिद्दीकी

काही महिन्यापासून परभणी जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे …..
खरीप आणि रब्बी हंगाम संपूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना कांतराव देशमुख झरीकर यांनी  परभणी जिल्हाधिकारी कार्यलय मार्फत दुधना प्रकल्पात शेतकऱ्यां साठी पाणी सोडण्यात यावे म्हणून मागणी केली नंतर मंत्रालयात मंत्री मोहदय दिवाकर रावते यांच्या ओळखी मुळे देशमुख यांनी त्यांच्या कळे या कामा चा तकादा लावला होता दिवाकर रावते यांनी हि कांतराव देशमुख यांच्या हाकेला धाऊन आले व दुधना प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील नागरिकांना शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी स्वतंत्रपणे लढा उभारला……..
स्वतः मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली……
परभणी जिल्ह्या कडे प्राधान्याने लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी त्यांनी केली……..
एवढेच नव्हे तर प्रगतिशील शेतकरी कांतराव देशमुख यांच्याशी संपर्क करून वेळोवेळी पाण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी एक वेगळी तरतूद करण्याचा मार्ग अवलंबला…….
प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आता शेतकऱ्यांचा आनंद हा अवर्णनीय आहे……

कांतराव देशमुख यांच्या मदतीला मंत्री धाऊन आल्याने देशमुख आनंदी झाले ते म्हणाले परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या वतीने त्यांचे आपण आभार मानत आहोत……… असा नेता होणे नाही जो संकटामध्ये धावून येतो……रब्बीची पेरणी न झाल्या मुळे चा-याचा प्रश्न निर्माण झाला होता आता तो या पाणी पाळी मुळे शेतकरी चारा पीक घेऊ शकतो व परिसरातील मुक्या जनावरांच्या पाणी प्रश्ननही सुटेल

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close