Breaking News

मानवत शहरात भर रस्त्यांवर वाढदिवस साजरा केल्यास कडक कार्यवाहि करणार- मिना कर्डक .

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

परभणी/खदीर विटेकर
परभणी जिल्ह्यातील मानवत येथे मध्यरात्री भर रस्त्यावर वाढदिवस साजरा करून गोंधळ घालण्याचे प्रकार दिवसेदिवस वाढत असल्यामुळे व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मीना कर्डक यांनी रसत्यावर वाढदिवस साजरा करण्यास बंदी घातली आहे .
जर कोणी रोडवर वाढदिवस साजरा करताना आढळल्यास कारवाई करणार असल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहेत. सध्या अशा प्रकारचे राजकीय नेतेसह किंवा कार्यकर्ते असे भर रस्त्यावर वाढदिवस साजरा करत असल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मीना कर्डक यांनी अशाप्रकारे वाढदिवस साजरा केल्यास पुढील वर्ष तुरुंगातच काढावे लागू शकते अशी कडक तंबी दिली आहे जर अशा प्रकारचे कोठेही वाढदिवस साजरा केला जात असेल तर मानवत पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक ०२४५१-२४०१००  या नंबर वर नागरिकांनी संपर्क करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक मिना कर्डक यांनी केले आहेत.

फोटो

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close