पालक मेळावा यशस्वीरित्या संम्पन्न
jintur
आज विलासराव देशमुख उर्दू मा. व उच्च मा. शाळा जिंतुर तर्फे गोवर रूबेला जनजागृति करण्यासाठी पालक मेळावाचे आयोजन करण्यात आले होते.या पालक मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका वैधकिय अधिकारी डॉ.दिनेश बोराड़कर, एम.आर. नोडल ऑफिसर डॉ. सुनील गांजरे, डॉ. इरफ़ान खान आगाई आणि खालेद देशमुख हे होते.सदरिल कार्यमात अध्यक्ष स्थानी संस्थाध्यक्ष काज़ी आसेफोद्दीन सिद्दीकी होते तर नगर परिषद अध्यक्षा साबिया बेगम कफ़ील फ़ारूक़ी यांची प्रमुख उपस्थिति होती.तज्ञ डॉक्टर्सनी पालकांसमोर या लसीकरणचे महत्व सांगितले आणि या बद्दल मुस्लिम समाजामध्ये जे भीति व गैर समज आहे त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला.कार्यक्रमाची सुरुवात क़ुरआन पठनाने करण्यात आली. प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अहमद सिद्दीकी सर यांनी मांडले तर सूत्रसंचलन मेराज सिद्दीकी सर यांनी केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नोडल शिक्षक अब्दुल मोइज़ सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात शंभरहुन अधिक पालक उपस्थित होते.