Breaking News

गणित विषयातील कौशल्य सर्व विषय समजण्यासाठी मदत करतात – प्रा.डाॅ.पंडित चोपडे

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

जिंतूर (प्रतिनिधी):

गणित हा विषय नेहमी विद्यार्थी व पालकांच्या चर्चेच्या केंद्रबिंदू असतो. परंतु अध्यापनात रंजकता आणून गणित विषय आवडता होवु शकतो. गणित या विषयातील कौशल्य आत्मसात केले तर सर्व विषय समजण्यासाठी मदत करतात असे प्रतिपादन ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर गणित विभागातील प्राध्यापक डाॅ. पंडित चोपडे यांनी जिंतूर शहरातील शिवाजी नगर येथील स्पार्टन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अॅन्ड रिसर्च येथे क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय गणित दिन’ उपक्रमात काढले. प्रसंगी इ.८वी’च्या विद्यार्थ्यांनी गणितीय चिन्हांचे भीत्तीपञक काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंजि. आशा दराडे होत्या.

पुढे बोलतांना डाॅ. पंडित चोपडे म्हणाले कि, गणित विषयाच्या भीतीमुळे त्याची नावड उत्पन्न होते. आपला परिसर शाळा अगदी बालगीतेदेखील “गणित विषय माझ्या नावडीचा..’ असे म्हणून मुळातले अपसमज आणखी घट्ट करतांना दिसतात. अशा वातावरणात अवघडपणा आणखी बोचू लागतो. याउलट हा विषय रोजच्या जगण्याशी कसा संबंधित आहे, हे खुबीने मुलांच्या मनावर ठसवीत हा विषय शिकवला तर नक्कीच त्यांची भीती दूर होईल. एखाद्या विषयावर प्रभुत्व असणे आणि तो विषय सोप्या पद्धतीने शिकविण्याची कला अवगत असणे या दोन्ही गोष्टी शिक्षणात महत्त्वाच्या असतात. त्या दृष्टीने शिक्षकांचा व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम आखावा लागेल.

प्रसंगी शिवम दराडे व मनिष मोरे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन, प्रास्ताविक व आभार प्रा.बाळू बुधवंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close