*योग संमेलन शिकवण गुरुजींची* योग शिबिर उत्साहात साजरे……
जिंतूर:-
पवित्र श्री दिगंबर जैन अतिशय क्षेत्र नेमगिरी जिंतूर येथे योग महागुरू अयंगार गुरुजी यांची जन्मशताब्दी आणि योग परिवाराच्या वर्षपूर्ति महोत्सवा निमीत्य योग परिवार जिंतुर आणि मार्तंड योगाश्रय सेलू यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि योग गुरु श्री परमेश्वरजी काकडे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योग गुरु श्री महेंद्रजी जोशी यांच्या मार्गदर्शना खाली तीन दिवसीय निवासी योग शिबिर दि. 23, 24, 25 डिसेंबर 2018 रोजी आयोजित केले होते. आपल्या (जिंतूर सेलू) तालुक्याचे लाडके आमदार मा. विजयरावजी भांबळे साहेब यांच्या हस्ते *योग संमेलन शिकवण गुरुजींची* या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
या योग संमेलनचा समारोपाचा कार्यक्रम दि. 25 डिसेंबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून योग गुरु श्री परमेश्वरजी काकडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सुंदरलाल सावजी अर्बन बँकेचे चेअरमन श्री मुकुंद सावजी कळमकर, श्री अविनाश सावजी, श्री ब्रिजगोपालजी तोषणिवाल, श्री दिलीपभाऊ सोनी, माजी नगर अध्यक्ष श्री सचिनजी गोरे, पो.निरीक्षक श्री आमले साहेब, उ.पो.नी. श्री जामदाडे साहेब, सहायक निबंधक श्री गुसिंगे साहेब, योगी महेंद्रजी जोशी हे उपस्थित होते. या शिबिरा दरम्यान श्री महेंद्रजी जोशी यांनी मानवाला माणूसपण येण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी प्राणायाम आणि आसने यांचे महत्व पटवून देवून साधकांकडून प्राणायाम तसेच विविध आसनाचा अचूक पध्दतीने योग अभ्यास आणि सराव करून घेतला. तसेच व्याख्याते श्री चेतन भागवत यांनी योग्य आहार विहार या विषयावर व्याख्यान देवून संतुलित आहार कसा असावा व विविध आजारावर घरगुती उपाय सांगीतले तसेच व्याख्याते श्री आनंद कुलकर्णी यांनी तणाव प्रबंध या विषयावर मार्गदर्शन करून ताण तणावाची कारणे, तनावमुळे मानवी शरिरावर होणारे विपरीत परिणाम आणि साधकांना तनावमुक्त जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला.
तसेच कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी योग गुरु परमेश्वर काकडे, मुकुंद सावजी कळमकर, सचिन गोरे, ब्रिजगोपाल तोषणिवाल, दिलीप भाऊ सोनी ,आमले साहेब यांनी साधकांना मार्गदर्शन करून योग परिवाराचे भरभरून कौतुक केले व पुढील कार्यक्रमास शुभेच्छा देवून आमचा खंबीर पाठिंबा असून भक्कम सहकार्य राहील असे व्यक्त केले. या प्रसंगी गुरुजींच्या जीवनावरील स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच साधकांना योगा बेल्ट व योगा ब्लॉकचे (प्रॉपचे) वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.कैलास मुटकुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दाभाडे सर यांनी केले तसेच हे योग शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सुनीलजी राठोड, सुरेशजी तावडे, विष्णु मुटकुळे, गजानन बुरकुले, प्रशांत घीके, प्रा अनिल संगवई सर, मुंजाजी अंभुरे, गजानन जवळे, नाना काटे, दाभाडे सर, अनंत मुटकुळे, सावळकर सर, डॉ.जोशी आदी साधकांनी सहकार्य केले.