Breaking News

कार्यकारणी बैठकीस उपस्थित राहावे – खंडेराव आघाव

जिंतूर – जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करून त्या समस्यांवर प्रभावी उपाय योजना अंमलात आणण्यासाठी तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा घडवून आणण्यासाठी शुक्रवार 28 डिसेंबर रोजी पालम येथे 11 वाजता व गंगाखेड येथे दुपारी 2 वाजता किसान मोर्चा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे, जिल्हाध्यक्ष खंडेराव आघाव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या बैठकीस पालम व गंगाखेड येथील कार्यकारिणीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष खंडेराव आघाव यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close