Breaking News

जिंतूरात 11 कि.मी. सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन * सायकल स्वारांचा निरोगी आयुष्य व प्रदूषण मुक्तीसाठी पुढाकार

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 

जिंतूरात :-
जिंतूर सायकल स्वार समूह व सायकल स्टुडिओ वाशिमच्या संयुक्त विद्यमाने निरोगी आयुष्य व प्रदूषण मुक्त शहराचा निर्मिती करण्यासाठी सायकल चालविण्याची गोडी निर्माण व्हावी म्हणून नूतन वर्षाचे औचित्य साधून रविवार ०६ जानेवारी रोजी ११ कि.मी. सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सायक्लोथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहर प्रदूषणमुक्त करण्याकरिता पुढाकार घ्यावा असे आव्हान आयोजकांनी केले आहे.
शहर व परिसरात वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून निरोगी आयुष्य निर्मिती करण्याकरिता तसेच नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी जिंतूर शहर व येलदरी येथील सायकल स्वार मागील एक वर्षापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. यावेळी नूतन वर्षाचे औचित्य साधून जिंतूर सायकल स्वार समूह व सायकल स्टुडिओ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने ०६ जानेवारी रोजी ११ किमी सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. सदरील स्पर्धा शहरातील साई मैदान – नेमगिरी पहिली कमान – साई मैदान अशी राहणार असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास टी शर्ट देण्यात येणार आहे. तसेच एका तासात स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहर प्रदूषणमुक्त करण्याकरिता पुढाकार घ्यावा असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

*जिंतूर सायक्लोथॉन स्पर्धेत आपले सहभाग निश्चित करण्यासाठी नाव नोंदणी सुरू झाली. त्वरा करून आपले नाव आजच निश्चित करा.*
*संपर्क -*
*शहेजाद खान – 9960424643*
*व्यंकटेश भुरे – 8482989898*

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close