Breaking News

पाल्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्नेहसंमेलन आवश्यक- प्रा. डॉ.प्रभाकर वजीर

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

पाल्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्नेहसंमेलन आवश्यक- प्रा. डॉ.प्रभाकर वजीर (जिंतूर). शाळेतील पाल्यांचे सुप्त गुण माहित होण्यासाठी विविध स्पर्धा बरोबरच नृत्य, आनंदनगरी, लोककलांसाठी स्नेहसंमेलने आवश्यक झाले असल्याचे मत प्रा डॉ.प्रभाकर वजीर यांनी व्यक्त केले. ते लोटस इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते .अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शामराव पवार तर उद्घाटक म्हणून डॉ. योगेश दहिफळे आणि प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, जिंतूर तालुका संस्थाचालकांचे तालुका अध्यक्ष रामराव उबाळे, ऍड .विनोद राठोड ,मुख्याध्यापक गोविंद लहाने, पत्रकार शेख शकील, रामप्रसाद कंठाळे, प्रतिष्ठित व्यापारी सुधीर शहाणे, नगरसेवक टीका खान पठाण, माजी नगरसेवक चंद्रकांत बहिरट आदी उपस्थित होते .प्रारंभी सरस्वतीचे पूजन करून स्नेहसंमेलनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ .मंगला ताई पवार यांनी केले. कार्यक्रमात पाल्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केली .प्रा. डॉ. प्रभाकर वजीर यांनी “बाई मी लाजाळू “हे भारूड सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमात मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली .सूत्रसंचालन सहशिक्षक वैद्य व कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष शामराव पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोटस इंग्लिश स्कूल या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले .कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close