ह्यूमन राईट्सचे आझाद मैदान मुबंई येथे आमरण उपोषण परभणी येथील वनीकरण विभागाच्या विविध भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

जिंतूर
अकबर सिद्दीकी
जिंतूर—-जिंतूर येथील ह्यूमन राईट्स या संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी गत 28 जानेवारी पासून वन विभागाच्या अनागोदी कारभारा विरोधात व आपल्या विविध मागण्या साठी आझाद मैदान मुबंई येथे आमरण उपोषणास बसले आहेत
या विषयी अधिकृत माहिती अशी की परभणी येथील सहायक वन संरक्षक यांची नियमबाह्य नियुक्ती रद्द करणे आणि सदरच्या नियुक्ती पासून विविध प्रकारच्या कामाची चौकशी करण्यात यावी पूर्णवेळ विभागीय वनाधिकारी तात्काळ नियुक्त करावा तसेच व्ही एन सातपुते यांनी निलंबन केलेल्या सर्व कर्मचाऱ्याची फेर चौकशी करावी असेही निवेदनात नमूद केले आहे यांच्या कारकिर्दीत सर्व आर्थिक अनागोदी कारभारचाही चौकशी करुन शासनाने सण 2018 मध्ये मोठा गाजावाजा करत 13 कोटी वृक्ष लागवड योजना जि राबवली सदर योजना परभणी जिल्ह्यात सम्पूर्ण निवळ धूळफेक व कागदोपत्री झालेली आहे कारण कुठेही वृक्ष जिवंत दिसत नाही रोपटीका रोपवन यांचे शासन नियमानुसार कुठेही संवर्धन व सगोपन झालेले नसून या सर्व कार्यक्रमात कागदोपत्री जुळवाजुळव करून मोठ्या प्रमाणावर बोगस मजूर दाखवून शासनाच्या तीजोरीवर डल्ला मारलेला आहे कागदोपत्री जास्तिची बोगस खरेदी झालेली असून यात मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे असेही निवेदनात नमूद केले आहे सदर निवेदनाच्या प्रति वन मंत्री सुधीर मुंनगीटवार यांना सुद्धा दिलेल्या आहेत
मुबंई येथील आझाद मैदानावर वरील सर्व मागण्या साठी ह्यूमन राईट्सचर विभागीय अध्यक्ष प्रा. सुभाष राठोड वैष्णव वाल्मिक व पत्रकार रफिक तांबोळी,सचिन स्वामी यांचा समावेश आहे