आणीबाणीतील संघी कार्यकर्त्यांना १० हजार आणि माझ्या शेतकऱ्यांला ५०० रुपये;ही शेतकऱ्यांची चेष्टा नाही का? – धनंजय मुंडे* *राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा पश्चिम महाराष्ट्रात…*

*अहमदनगर – पाथर्डी दि. १ फेब्रुवारी -* – आणीबाणीच्या काळात संघातील ज्या लोकांना तुरुंगवास झाला होता त्या लोकांना भाजप सरकार दहा हजार रुपये महिना देते आणि माझ्या शेतकऱ्यांना पाचशे रुपये महिने दिले आहेत. ही शेतकऱ्यांची चेष्टा नाही का ?असा संतप्त सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पाथर्डीच्या जाहीर सभेत सरकारला केला.
तिसऱ्या टप्प्याच्या पाचव्या दिवसातील पहिली सभा पाथर्डी येथे तुफान गर्दीमध्ये पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
आज बजेट सादर झाला आहे. ज्यापद्धतीने १४ साली घोषणा केल्या होत्या त्याचपद्धतीने या बजेटमध्येही भल्यामोठ्या घोषणा आहेत. आता या बजेटच्या आधारावर मोठमोठी भाषणे केली जातील पण लक्षात ठेवा इस धारावाहीक की सारी कथाऐ काल्पनिक है.. असं म्हणताच सभेत एकच हंशा पिकला.
आज माझा शेतकरी अडचणीत आहे परंतु सरकार दुष्काळ गांभीर्याने घेत नाही असेही धनंजय मुंडे म्हणाले
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब पाथर्डीला मावशी म्हणायचे आणि माझ्या नात्यानुसार ही पाथर्डी माझी आजी आहेत.त्यामुळे पाथर्डीच्या सभेला जमलेल्या सर्व जनतेचे धनंजय मुंडे यांनी आभार मानले.
पाथर्डी भागात एक काळ असा होता की भगवान गडावरून मुंडे साहेबांनी एक भाषण केले होते आणि धनंजय मुंडे त्यावेळी खलनायक चित्रपटाचा संजय दत्त झाला होता. मात्र त्याच पाथर्डीने आज माझे स्वागत केले अशी आठवणही धनंजय मुंडे यांनी करुन दिली.
आमच्या लोकनेत्याचे अपघाती निधन झाले. सांगण्यात आले की कार अपघात होता मग कोणत्या ड्रायव्हरला शिक्षा झाली आणि कोणत्या कोर्टात झाली ते स्पष्ट झाले पाहिजे
मुंडे साहेबांचा राजकीय वारस सांगणाऱ्यांनी देखील निधन झाले त्यावेळी ट्विट करून संशय व्यक्त केला होता मग ते ट्विट दोन मिनिटात का डिलीट केले असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.
इथे भाजपचा खासदार आहे त्याने या भागासाठी काय केले ? असा सवाल करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसवर तुम्ही विश्वास टाका जेवढा जीव मुंडे साहेबांनी या पाथर्डीला लावला तेवढा मी लावण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले.
या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार वैभव पिचड, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके-पाटील,अविनाश आदीक, प्रतापराव ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंडपाटील आदींसह पाथर्डी, शेवगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.