उत्कृष्ट काम करणाऱ्याय ‘आशा’चा गौरव

अकबर सिद्दीकी
जिंतूर, दि. ३ – येथे १ पेâबु्रवारी रोजी आशा दिवस हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून रुबेला, गोवर लसीकरणाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या आशाताई व आरोग्य कर्मचाऱ्याच्या शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन भायेकार , तालुका आरोग्य अधिकारी दिनेश बोराळकर, जिल्हा कार्यक्रमाधिकारी काकडे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. माजेद, डॉ. सीमा पठाण, डॉ. सायली पाटील, डॉ. सुनील गाजरे, डॉ.ए.बी. भायेकार , तालुका आरोग्य कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच गट प्रवृत्र्तक मीरा देशमुख यांची उपस्थिती होती. आशा दिवसाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधुन गोवर,रुबेला लस तालुक्यामध्ये उत्कृष्ट काम करणाNया आशा ताई व अंगणवाडी कार्यकत्र्या आदींचा मान्यवरांच्याहस्ते सन्मानपत्र व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आशा स्वयंसेविकेने गीतगायन, कविता वाचन, नृत्य, नाटीका सादर केल्या. अंधश्रद्धा निर्मुलनावरील नाटीका तसेच लसीकरण जनजागृती करण्यासाठी तयार केलेली नाटीका सादर केल्या. यावेळी डॉ. सचिन भायेकार , डॉ. दिनेश बोराळकर यांनी आशा कार्यकत्र्यांना मार्गदर्शन करुन आशा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यशस्वीतेसाठी मीरा देशमुख यांनी सहकार्य केले.