राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ कमिटी समन्वयकपदी उत्तरवार यांची नियुक्ती

बिलोली
बिलोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बिलोली येथील दिशा केंद्रात बूथ कमिटी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.या वेळी या पक्षाचे युवा कार्यकर्ते संतोष उत्तरवार यांची सर्वानुमते पक्षाच्या तालुका बुथ कमिटी समन्वयकपदी निवड करण्यात आली असुन निवडीचे नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष जगनदादा शेळके, जिल्हा सरचिटणीस डॉ. विक्रम देशमुख,I.T CELL चे प्रदेश उपाध्यक्ष मतीन इनामदार,नायगाव ता.सचिव. श्याम चोंडे, तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर,शहराध्यक्ष अर्जुनराव अंकुशकर,कार्याध्यक्ष यशवंत गादगे ,युवक सरचिटणीस संतोष उत्तरवार, विधानसभा अध्यक्ष आनंद गुडमलवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुन्ना पोवाडे,सादिक पटेल,शेख मोहसीन अहेमद,जनिमिया सावळीकर,श्रीकांत माचलोड, आदींची उपस्थिती होती.