Breaking News

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापारी महासंघाच्या जिंतूर बंद आवाहनाला प्रचंड प्रतिसाद

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

.       संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर
दि १८फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील दहशतवादी हल्यााच्या निषेधार्थ जिंतूर तालुका व्यापारी महासंघा च्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला असून आज
जिंतूर बंद १००%यशस्वी झाला
शहरातील शाळा कॉलेज दुकाने कापड किराणा आडत मेडिकल दवाखाने छोटे व्यापारी फळ भाजीपाला किरकोळ व्यवसायिक असे सर्व क्षेत्रातील व्यापारी या बंद मध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते
पुलवामा आतंकी हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली आणि कठोर कार्यवाही साठी जिंतूर ता व्यापारी महासंघ कडून भव्य मोर्चा काढण्यात आला नवा मोंढा येथून नृसिह चौक वरुड वेस मेन चौक पोलीस स्टेशन शिवाजी चौक मार्गाने तहसील कार्यालय जिंतूर येथे भव्य मोर्चा द्वारे तहसीलदार सुरेश शेजुळ यांना निवेदन आले या वेळी व्यापारी महासंघाने दिलेल्या निवेदनात दहशतवादी हल्ल्या बाबत कठोर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली निवेदनावर रमेश दरगड सुनील तोष्णीवाल राजू देवकर गणेश कुरे प्रदिप कोकडवार सत्यनारायण शर्मा संजय कोकडवार शेख ताज बाबा पठाण कैलास थिटे सुधीर शहाणे संतोष देशमुख अमोल एकसिंगे यांच्या सह्या आहेत या वेळी जिंतूर ता व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड ब्रिजगोपाल तोष्णीवाल प्रदिप कोकडवार यांनी बंद बाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्या बाबत मनोगत करून आभार व्यक्त केले मोर्चात महेश महाराज जिंतूरकर,तजमूल मौलाना, आ विजयराव भाम्बले,प्रताप देशमुख खंडेराव आघाव नगराध्यक्ष नगरसेवक यांच्या सह सर्व धर्माचे नागरिक विध्यार्थी उपस्थित होते समारोप राष्ट्रगीत घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली प्रचंड प्रतिसादा बद्दल आभार व्यक्त करण्यात आला

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close