Breaking News

शेतकऱ्यांचे अच्छेदिन , यादी पोर्टलवर अपलोड प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत 1 लाख 30 हजार पात्र शेतकरी कुटुंबियांची यादी पोर्टलवर ॲपलोड

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक, अकबर सिद्दीकी

जिंतूर (संकलित वृत्त) दि. 23 – शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत परभणी जिल्हयातील सुमारे 1 लाख 30 हजार 52 पात्र शेतकरी कुंटुंबियांची यादी एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी दिली.

शेतक-यांना‍ निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही योजना सुरु केली आहे. या योजनेचे औपचारीक शुभारंभ प्रधानमंत्री यांच्याहस्ते दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी गोरखपुर, उत्तर प्रदेश येथे सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या धर्तीवर राज्याने राज्यस्तर, जिल्हास्तर व गटस्तर आणि कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

जिल्हास्तरावर जिल्हयाच्या ठिकाणी या कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी तर तालुकास्तरावर तालुक्याच्या मुख्यालय ठिकाणी कार्यक्रम होणार आहे.

सकाळी 10.30 ते 11.00 यावेळेत पीएम किसान योजनेची माहिती शेतक-यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर मन की बात या कार्यक्रमांचे प्रसारण होईल. त्यानंतर प्रधानमंत्री यांच्याहस्ते होणा-या शुभारंभ कार्यक्रमांचे प्रसारण होईल. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हयाठिकाणी कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

परभणी जिल्हयात एकूण 848 गावे असून 8 अ प्रमाणे खातेदार शेतक-यांची संख्या 4 लाख 48 हजार 201 एवढी आहे. 834 गावांची माहिती संकलीत झालेली आहे. परिपुर्ण असलेल्या पात्र शेतकरी कुंटुंबियांची संख्या 1 लाख 71 हजार 47 एवढी आहे. 788 गावातील 1 लाख 30 हजार 52 पात्र शेतकरी कुटुंबियांच्या माहिती एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी 76.03 एवढी आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close