Breaking News

दुसऱ्या डॉक्टर्स क्रिकेट लीग स्पर्धेत JDA SPARTAN ठरली

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

.        संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर :- नुकत्याच परभणी येथे IDA तर्फे घेण्यात आलेल्या दुसऱ्या डॉक्टर्स क्रिकेट लीग ” क्रिकेट फेस्ट – 2 ‘ या फेब्रु 2019 स्पर्धेत जिंतूर तालुका डॉक्टर्स असोसिएशन ची JDA SPARTAN क्रिकेट टीम विजेती ठरली . त्यांनी अंतिम सामन्यात ” Nima ” क्रिकेट टीमचा अत्यंत चुरशीच्या सामन्यात 2 विकेट नी शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला. त्याबद्दल JDA Spartan टीमला विजयी क्रिकेट चषक व प्रथम क्रमांकाचे रोख 25, 000 ₹ चे पारितोषिक मिळाले .
परभणी येथील इंदिरा गांधी स्टेडियमवरील या स्पर्धेत एकूण 8 टीम सामील झाल्या होत्या . JDA Spartan क्रिकेट टीम ने सुरवातीला लीग मॅच मध्ये दोन्ही सामने हारले होते , परंतु तिसऱ्या व महत्वाच्या सामन्यात त्यांना Civil क्रिकेट टीम सोबत खेळतांना उपांत्य फेरीत जाण्यासाठी 6 ओव्हर मध्येच 66 रन चे आव्हान भेटले त्यात जिंतूर च्या JDA Spartan टीमने 5. 3 ओव्हर मध्येच पूर्ण केले . या सामन्यात मोहसीन शेखच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांना ‘ सामनावीर ‘ चा पुरस्कार मिळाला . उपांत्य सामन्यात ” IMA ” क्रिकेट टीम परभणी ने टॉस जिंकून विजयासाठी JDA Spartan ला 81 धावांचे आव्हान दिले ते JDA ने शेवटच्या चेंडूवर विजयी रन घेऊन 4 विकेट्स राखून , बलाढ्य IMA टीम वर मोहसीन शेख यांच्या फलंदाजीमुळे मात केली यात त्यांना ” सामनावीर ” पुरस्कार मिळाला.
अंतिम सामन्यात ‘ Nima ‘ क्रिकेट टीम ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेऊन जिंकण्यासाठी JDA Spartan समोर 10 ओव्हर मध्ये विजयासाठी बलाढ्य 118 रन चे आव्हान ठेवले . अभिजित व अविनाश चवंडके बंधु यांच्या उत्कृष्ट फलंदाजी मुळे या अटीतटीच्या सामन्यात अपराजित ” Nima ” क्रिकेट टीमचा 2 विकेट्स नी पराभव केला . या अंतिम सामन्यात अभिजीत चवंडके यास अष्टपैलू खेळाडू चा ” सामनावीर ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . जिंतूरच्या JDA Spartan क्रिकेट टीमने या संपुर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सांघिक कामगिरीचे उत्कृष्ट प्रदर्शन करून संपूर्ण प्रेक्षकांची मने जिंकली .
जिंतूरच्या इतिहासात पहिल्यादांच प्रथमत: JDA Spartan टीम ने विजयी चषकावर जिंतूरचे नाव कोरून संपूर्ण परभणी जिल्ह्यात नावलौकिक मिळविला .
या क्रिकेट टीममध्ये कप्तान शिवप्रसाद सानप , उप – कप्तान शैलेश राठोड , रुपेश तडकसे , अभिजित चवंडके, नितेश कुटे ,मोहसीन शेख , संतोष घुगे , सुनील गांजरे , गजानन नव्हाट , गजानन जाधव , , अविनाश चवंडके , भागवत सांगळे , योगेश तुरे , इरफान पटेल व बाळासाहेब घुगे या खेळाडूंनी सहभाग नोंदविला .संघासाठी प्रमुख मार्गदर्शन विक्रम परिहार यांनी केले . या स्पर्धेत सामन्याचे उत्कृष्ट धावते वर्णन इरफान पटेल यांनी केले तसेच या स्पर्धेत सर्वोत्तम बॉलर विठ्ठल सिसोदिया , सर्वोत्तम फलंदाज व स्पर्धेचा मानकरी जिंतूरच्या विजय गजभारे यांना ‘किताब मिळाला .
” Nima ” क्रिकेट टीम उप – विजेता ठरली .
या विजयाबद्दल संपूर्ण JDA SPARTAN क्रिकेट टीमचे जिंतूर तालुका डॉक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. शिवप्रसाद सानप यांच्याकडून तसेच मार्गदर्शक डॉ . विक्रम परिहार , THO डॉ . दिनेश बोराळकर , डॉ. सुरेश खापरे व संपूर्ण डॉक्टर्स व JVJ sports acadamy जिंतूर आणि सर्व पत्रकार बंधु यांच्या कडून अभिनंदन करण्यात येत आहे .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close