Breaking News

वाममार्गाने संपत्ती कमावली तर त्याची पुढची पिढी सुखाने जगू शकत नाही — निवृत्ती महाराज इंदुरीकर

[responsivevoice_button voice="Hindi Female"]


   

 संपादक :- अकबर सद्दीकी

जिंतूर प्रतिनीधी
माणसाने जीवनामध्ये काबाडकष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवला पाहिजे इमानदारीने कमावलेले धन आयुष्यभर पुढची पिढी सुखाने जगत असते मात्र वाममार्गाने कमावलेली संपत्ती पुढचा पिढीला सुखाने जगू देत नाही म्हणून चांगले कर्म करा असे प्रतिपादन ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी शिवसेनेचा वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कीर्तन सोहळ्यात केले.
या कीर्तन सोहळ्यास खा संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सेलू जिंतूर विधानसभा प्रमुख राम पाटील,
जिल्हा प्रमुख सुरेशबाप्पा ढगे,युवासेना जिल्हा प्रमुख दिपक बारहाते,उपजिल्हा प्रमुख माणिक पोंढे सहसंपर्क प्रमुख गंगाप्रसाद घुगे, बंडू लांडगे,रणजित गजमल,राम शर्मा,रमेश डख,भारत पवार,नावनाथ देशमुख,हनुमंत बोबडे,शिवाजी ढवळे,रितेश पांडे, कांतराव धानोरकर,परमेश्वर ठोंबरे,विरु बांगर,लखन माने,गोविंद देशमुख,दिपक खाताळ,सनईकर,संदिप अंबुरे आदीजण
उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना सांगितले की,मानवी जीवनात संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांची विचार आत्मसात करून देशसेवा केली पाहिजे तसेच प्रत्येक हिंदूचा घरात ज्ञानेश्वरी ग्रंथ असला पाहिजे यावेळी त्यांनी आपल्या विनोदी सैलीतून सध्या चालू असलेल्या घडामोडीवर तुफान फटकेबाजी केली मागील पाच वर्षांपासून मतदारसंघात राम नाना पाटील यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत,गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य जनावरांना मोफत चारा, तसेच सेलू व जिंतूर तालुक्यात उन्हाळ्यात थंड जारचे पाणी उपलब्ध करून देत असतात म्हणून त्यांचे सामाजीक बांधिलकी अत्यंत वाखान्याजोगी आहे त्यामुळे अशा सर्वसामान्य कुटुंबातील सामाजीक जाणीव ठेवणाऱ्या या नेत्याचा पाठीशी खंबीरपणे मायबाप मतदारांनी उभे राहून राम नाना पाटील यांना आमदार करावे खा संजय जाधव यांना पुन्हा खासदार म्हणून संसदेत पाठवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या कीर्तन सोहळ्यासाठी सेलू जिंतूर मतदार संघातील शिवसेनेचा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने महिला नागरीकानी कीर्तनाचा लाभ घेतला

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close