Breaking News

● *जिंतूरात फळे – भाजीपाला शेतमालावर शेतकऱ्यांकडून दहा टक्के कमिशन वसुली* *- फळे -भाजीपाला नियमण मुक्तीचा फज्जा* *- अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तहसीलदारांना निवेदन*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

.        संपादक :- अकबर सिद्दीकी

● जिंतूर / प्रतिनिधी

भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या शेत मालावर कमिशन वसूल करू नयेत असे शासनाने आदेश देऊनही जिंतूर येथील व्यापाऱ्यांकडून कमिशन पोटी 10 टक्के रक्कम वसूल केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने मंगळवार 26 फेब्रुवारी रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन याबाबत तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिंतूर तालुक्यात मागील तीन ते चार वर्षांपासून सतत दुष्काळाचे सावट पसरले असताना शेतकरी फळे व भाजीपाला यांचे उत्पादन घेऊन आपली उपजीविका करत असताना बाजारात शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे जिंतूर भाजीपाला यार्डात फळे भाजीपाला या नाशवंत शेतमालावर कच्चा पावत्यांच्या आधारे बेकायदेशीर आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या शेतमालावर शेकडा दहा टक्के रक्कम कमिशन स्वरूपात वसूल करण्यात येत आहे तसेच या आडत व्यापाऱ्यांकडे बाजार समितीचा किंवा शासनाच्या इतर कुठलाही परवाना नसताना आज पर्यंत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली जात आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर यांनी आजपर्यंत फळे भाजीपाला यांचे नियमन केलेले नाही त्यामुळे मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत असून यावर कुणाचाही वचक नसल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम 1963 व नियम 1967 अन्वये, संबंधित व्यापार्‍यावर कडक कार्यवाही करून त्यांच्याकडील कच्चा पावत्यांच्या आधारे लूट होत असल्याबाबत चे जुने दस्तावेज जप्त करून कार्यवाही करावी तसेच आज पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर यांच्याकडून भाजीपाल्याचे नियमन का करण्यात आले नाही यामधील दोषी अधिकाऱ्यांवर दोषी अधिकार्‍यांची योग्य चौकशी करून तात्काळ कार्यवाही करून भाजीपाला यार्डातील संपूर्ण व्यवहार (खरेदी विक्री) हा बाजार समितीच्या देखरेखीत तात्काळ सुरू करून फळे भाजीपाला या मालाचे बाजार समितीने आज पर्यंत का नियमन केले नाही याची योग्य चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष गुलाबराव शिंदे सचिव मंचकराव देशमुख, उपतालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे, शेख गफार शेख अफजल, किशन प्रसाद खाडे, रमेश देवकते , जनार्दन माकोडे, रंगनाथ काळदाते, शेषराव सडाळ, मधुकर गोरे तुकाराम गायकवाड आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

[ *कमिशन वसुली बंद न झाल्यास उपोषणाचा इशारा*
जिंतूर भाजीपाला यार्डात शेतकऱ्याकडून फळे व भाजीपाला या शेतमालावर 10% रक्कम विनापरवाना धारक आडत व्यापाऱ्यांकडून वसुली होत असल्याबाबत गंभीर बाब समोर आली असताना प्रशासनाकडून आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने येत्या काळात प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा ग्राहक पंचायतचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे यांच्याकडून देण्यात आला आहे.]

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close