Breaking News

पुलवामा हल्ल्यातील शहीदाच्या कुटुंबाला एक लाखाची आर्थिक मदत संभाजी ब्रिगेड सामाजिक व चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम

      संपादक :- अकबर सिद्दीकी

प्रतिनीधी /जिंतूर
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलढाणा जिल्हातील चोर पांगरा व मलकापूर येथील वीर जवान नितीन राठोड व संजय राजपूत यांना आपला प्राण गमवावा लागला या हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना जिंतूर येथील संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने रविवार 3 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमास फाटा देऊन दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत धनादेशा द्वारे देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती की,जिंतूर शहरात मागील मागील दहा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येत असते मात्र यावर्षी 14 फेब्रुवारी रोजी काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात दहशद वाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जवळपास 44 जवान शहिद झाले होते परिणामी संपूर्ण देशावर व शहिद कुटुंबावर शोककळा पसरली होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमित्त आयोजीत करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमास फाटा देण्यात आला यावेळी जमा केलेला निधी शहीद जवानांचा कुटुंबाला देण्याचे निश्चीत करण्यात आले होते. त्यानुसार चोरपांगरा येथील शहीद जवान नितीन राठोड यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले व पन्नास हजार रुपयांचा धनादेश नितीन राठोड यांची पत्नी सौ वंदना राठोड या आजारी असल्याने त्यांच्या आई व वडील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला तर मलकापूर येथील शहिद जवान संजय राजपूत यांच्या कुटुंबाची भेट घेण्यात आली व पन्नास हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजीक संघटनेचे विभागीय अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर ,तालुका अध्यक्ष बाळासाहेब काजळे,चॅरिटेबल ट्रस्टचे अॅड .विनोद राठोड,ज्ञानेश्वर रोकडे,दीपक डोंबे,विजय भांबळे,सोपान धापसे,गोपाळ शिंदे,सचिन डोईफोडे,कृष्णा देशमुख,अनिल दाभाडे,प्रशांत हराळ,सौरभ घुगे यांच्या सह चॅरिटेबल ट्रस्ट व संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी उपस्थित होते.

[ यावेळी शहीद वीर जवानांच्या कुटुंबांना आपला एक दिवसांचा व्यवसाय देण्याचा निर्णय शहरातील शिवछत्रपती झेराॅक्स चे संचालक सोपान धापसे यांनी घेतला होता. यावेळी त्यांच्या वतीने प्रत्येकी एकविशे रूपयांची आर्थिक मदत शहिद कुटुंबियां कडे धनादेशा द्वारे सुपूर्द करण्यात आली. ]

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close