14 व्या विद्रोही मराठी साहित्य सम्मेलनाने अध्यक्ष डॉ लुलेकराचा सत्कार

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर—दि. १६ व १७ मार्च २०१९ रोजी हिंगोली येथे आयोजित १४ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांची निवड झाल्याबद्दल ७ मार्च रोजी जिंतूर येथे बहुजन हितकारिणी सभा या सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
*किती येवोत द्रोणाचार्य, काळ वआता डरणार नाही, नवा एकलव्य येत आहे, दान अंगठ्याचे होनार नाही.*
आमचे साहित्य आम्ही निर्माण करू,आणि आमच्या ग्रंथकार सभा आम्ही घेऊ. अशी कणखर भूमिका दि. ११ जुन १८८५ साली मराठी ग्रंथकार सभेच्या निमंत्रणावरून म. जोतिबा फुले यांनी घेतली होती. त्याला अनुसरून १९९९ पासून विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून विद्रोही साहित्य संमेलनाचा सुरु झालेला प्रवाह आता जनतेच्या सहकार्याने महाप्रवाह बनत आहे.
देशात बहुजन समाजाला अवमानीत करण्यासाठी महामानवांच्या इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. पुरोगामी विचारवंतांच्या हत्या होत आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. स्त्रियांवरील अत्याचार प्रचंड वाढले आहेत. जनतेच्या जाणीवा बधिर केल्या जात आहेत. उच्च शिक्षणापासून बहुजन हद्दपार होत आहेत. विस्थापित आदिवासी, शेतकर्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तीव्र बनत चालले आहेत. जातीव्यवस्था समर्थक सनातनी सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली विषमतावादी व्यवस्था निर्माण करु पाहात आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर कला-साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रात विद्रोही समतावादी भूमिका घेण्यासाठी विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र च्या वतीने दि .१६ व १७ मार्च रोजी हिंगोली येथे १४ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात साहित्यिक, कवी, समीक्षक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात विद्रोही कवी संमेलन, परिसंवाद तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रातील नामवंत कवी, साहित्यिक, विचारवंत सहभागी होणार आहेत. करिता समस्त बहुजन जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. या वेळी प्रा डा यशवंत खडसे प्रा सदानंद पुडगे प्रा विलास पाटील प्रा बालाजी मोगल प्रा कृष्णा गजभारे अड कुमार घनसावन्त लोमेश अंभोरे नाथराव खदारे प्रकाश गवई डी एस सावंत राजू वाकळे चंदू पूडगे डि एस सोनूनें शंकर हनवते एल जी गायकवाड बळीराम उबाळे देवेन्द्र लांडगे अड निलेश घनसावन्त कोंडीबा भिसे या सह आदी मान्यवर
या सत्कार कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी साहित्य प्रेमी उपस्थित होते सदर कार्यक्रमा साठी बहुजन हितकारिणी सभा संघटनेच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले