Breaking News

* आता माघार नाही, दोन दिवसात निर्णय,मी महिला उमिदवर,परिवर्तन घडणारच- * माझे काम बागून जिल्ह्यतील मतदार मतदानाच्याया स्वरूपात धक्का मारून दिल्ली ला पोचविणार -मेघना बोर्डीकर

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

    संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर, ः-  मागील 2012 पासून मी सातत्याने राजकारणाबरोबरच समाजकारण करत आले आहे. सर्वच जण 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण म्हणतात. परंतु याउलट मी समाजकारणाला मी अतिमहत्व दिल्यामुळे आज 1 लाख कुटूंबियांची सदस्य बनली आहे. याच भरोशावर आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही तर मी महिला उमेदवार आहे सर्व महिला माझ्या पाठीशी उभे राहणार मला विश्वास आहे येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाईल परभणी तील मतदार मतदानाचा च्या स्वरूपात धक्का मारून दिल्ली पाठविणारचआता जिल्ह्यात परिवर्तन घडविणारच असा ठाम विश्‍वास मेघना दीदी बोर्डीकर यांनी दिनांक 18 मार्च रोजी परभणी येथे कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यामुळे भाजपच्या युवा नेत्या मेघना दीदी बोर्डीकर यांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागत आहे. ही खंत मनात बाळगून त्यांनी निवडणूक लढवावी किंवा नाही याचा निर्णय घेण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की राजकारणाची वाट ही अडथळ्यांची शर्यत असते. मला परकीयांकडून तर सोडा स्वकीयांकडून अनेक अडचणी आल्या. मी बोर्डीकरांची कन्या आहे आणि तुमची दीदी आहे. तुमच्या आशिवार्दानेच मला दुप्पट शक्ती निर्माण झाली असून या शक्तीच्या बळावर मी आता कुठल्याही परिस्थितीत हाती घेतलेले काम पूर्णत्वास गेल्याशिवाय माघार घेणार नाही. मी गेल्या 6 वर्षांपासून ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, जलसिंचन, पर्यावरण मुद्यांवर काम करत आले आहे. मी मतदारसंघातील 1300 गावात संपर्क साधून समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचेच प्रतीक आज या भव्य मेळाव्याच्या रूपाने आपल्यासमोर दिसत आहे. दोन दिवस वाट पाहा निर्णय नक्कीच तुमच्या मनातला होईल असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अध्यक्षीय पदावरून बोलतांना माजी. आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी आपल्या मुलीच्या कामाबद्दल अभिमान व्यक्त करताना माझी मुलगी आता माझ्या बरोबरीची झाली आहे. ती जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. आज जरी निर्णय नाही घेता आला तरी दोन दिवसांत मी माझा निर्णय निश्‍चितच घेईल व तो तुमच्या मनासारखा असेल असे त्यांनी यावेळी सांगितले. जनतेला देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजे आहे. तसेच या मतदारसंघात सुध्दा सुशिक्षित उमेदवार हवा आहे हे या मेळाव्यावरून लक्षात येते असे स्पष्ट करत त्यांनी निवडणुक लढविणारच असा गर्भित इशारा दिला.
यावेळी भाजपचे आजी माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे वैशिष्टय म्हणजे मतदारसंघातील घनसावंगी ते पूर्णा आणि जिंतूर ते गंगाखेड अशा सर्वच तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close