Breaking News

शिवजयंती घरगुती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात उत्सव साजरा करण्याचा उपक्रम

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

.        संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर प्रतिनीधी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व संभाजी ब्रिगेड सामाजीक संघटनेचा वतीने शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या उपक्रमाच्या माध्यमातून घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा निकाल जाहीर करून बुधवार दि 27 मार्च रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते परितोषिकांचे वितरण करण्यात आले.

संपूर्ण भारतभर व देश विदेशात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येत असते याच माध्यमातून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व संभाजी ब्रिगेड सामाजीक संघटना यांचा संयुक्त विद्यमाने 19 ते 22 फेब्रुवारी दरम्यान तालुक्यात शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या उपक्रमाच्या माध्यमातून घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत जवळपास तिनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सदरील स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला होता. यामध्ये प्रथम संकेत दाभाडे द्वितीय अक्षय सावरगावकर तृतीय वैभव मोरे तर उतेजनार्थ अश्विनी जोशी यांना जय हरिओम यांच्याकडून मोबाईल व गणेशभाऊ काजळे मित्रमंडळाचा वतीने सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.या पारितोषिक वितरण कार्यक्रमास चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ दुर्गादास कान्हडकर डॉ विवेक थिटे,बालाजी शिंदे सोसकर,ऍड विनोद राठोड,मनोज थिटे,बाळासाहेब काजळे,सोपान धापसे,विष्णू गाडेकर,अनिल दाभाडे हे तर गणेशभाऊ काजळे मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष भागवत कापुरे,राम पाटील,कल्याण इंझे,भानुदास घुले व जय हरिओमचे संचालक हरीश मुंदडा हे उपस्थीत होते या कार्यक्रमासाठी विजय बालासाहेब भांबळे,दीपक डोंबे,बाळू तळेकर,सुंदर मस्के,किरण कोकाटे,सौरभ घुगे,अक्षय डोईफोडे, प्रशांत हराळ,राजू घुगे,पियुष शिंदे,बंटी काळे आदींनी प्रयत्न केले. दरम्यान सर्व सहभागी स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिवन चरित्रावरील ग्रंथ भेट देण्यात येणार असून स्पर्धकांनी आयोजकांशी संपर्क करून घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close