Breaking News

परभणी एफ एम चा आवाज आता घुमणार जगभ, आखेर परभणीकरांची प्रतीक्षा संपली

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

 


संपादक :- अकबर सिद्दीकी
परभणी :  

नव्यानेच परभणी रेडीओ ९०.८ हा परभणींच्या रसिकांसाठी कार्यान्वित करण्यात आला आहे. त्या पाठोपाठच आता अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर ‘परभणी रेडिओ ९०.८’ हे नवीन अ‍ॅप सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आता परभणी केंद्र हे केवळ परभणी पुरतेच मर्यादित न राहता संपूर्ण देशभरात कोठेही परभणीचा आवाज ऐकता येण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. केवळ परभणीतच नाही तर आता देशभरात कुठेही परभणी रेडिओ ९०.८ चा आवाज सगळ्यांना ऐकता येईल. फक्त मनोरंजनच नाही तर दिनविशेषानुसार प्रत्येक विषयावर रोचक, रंजक आणि बहारदार कार्यक्रम आपण ऐकू शकाल. आज अक्षय तृतीयाच्या या मुहूर्तावर म्हणजेच मंगळवार, ७ मे रोजी ‘परभणी रेडिओ ९०.८’ हे नूतन अँप लॉन्च करण्यात आला आहे.
या अ‍ॅपच्या सहाय्याने आपल्याला देशभरात कुठेही परभणीचा आवाज ऐकता येईल. एवढेच नाही तर फेसबुक पेज, इंस्टाग्राम, ट्विटरवर आणि युट्यूबवरील क्लिप्स तसेच रोजचे अपडेटही आपल्याला सहज उपलब्ध होणार आहेत. फक्त मनोरंजनच नाही तर दिनविशेषानुसार प्रत्येक विषयावर रोचक, रंजक आणि बहारदार कार्यक्रम आपण ऐकू शकाल. प्ले-स्टोर वरून हे अँप आपल्याला सहजपणे डाऊनलोड करता येईल आणि आपल्या परभणीचा बुलंद आवाज ऐकता येईल. या अँपसाठी खास दिल्लीहून राघवेंद्र ओझा आणि पांड हे इंजिनिअर द्वय परभणीत आले आहेत. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर हे अँप लॉन्च करण्यात आले.
 याप्रसंगी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील, साहित्यिक तथा रेडिओ संचालिका अर्चना डावरे, आर.जे. देव, कार्तिक, ऐश्वर्या मार्केटिंग टीमचे तुषार चोभारकर, टेक्निशियन मकरंद कुलकर्णी, योगेश मोरे, गौरव सहस्त्रबुद्धे आणि ऐश्वर्या हरकळ आदींची उपस्थिती होती. हे अ‍ॅप कोणत्याही मोबाइल मधे प्लेस्टोअर मधून डाऊनलोड करता येऊ शकताता. या मधे तुम्ही कॅटेगरीवाईज कार्यक्रम ऐकू शकता. कोणताही कार्यक्रम केव्हाही ऐकता येईल, सोबत रेकॉर्ड ही करता येईल. या अ‍ॅपला हेडफोन्सची आवश्यकता नाही. आपल्याला टेक्स्ट फिड बॅक, व्हाईस फिडबॅक देता येतील. अशा अनेक सुविधा या अ‍ॅप्लीकेशन मध्ये आहेत


          

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close