Breaking News

जिंतूर शहरात झाडे लावण्याचा संकल्प करून छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व संभाजी ब्रिगेड सामाजीक संघटनेचा उपक्रम

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर प्रतिनीधी
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट व संभाजी ब्रिगेड सामाजीक संघटना यांचा वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची 356 वी 14 मे रोजी जयंती उत्साहात साजरी करून शहरात 356 झाडे लावण्याचा संकल्प करून उपस्थितांच्या हस्ते वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली.

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती 14 मे रोजी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते याचेच औचित्य साधून संभाजी ब्रिगेड सामाजीक संघटना व छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचा वतीने संभाजी ब्रिगेडचा कार्यालयात विविध मान्यवरांचा हस्ते पूजन करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी शहरात पर्यावरणाला पूरक असलेल्या वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करून वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली या जयंती कार्यक्रमास डॉ दुर्गादास कान्हडकर,डॉ विवेक थिटे,इंजि.आनंद पवार,संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब काजळे,ऍड अमित वायकोस डॉ. जायभाये,सोपान धापसे,प्रताप सुर्यवंशी, बाबाराव डोंबे, राजेश गाडेकर, सुनील गाडेकर, श्रीहरी शेळके,घुगे, विष्णू गाडेकर, मोहनराव राठोड, ज्ञानेश्वर लिपणे,आकात, हरीभाऊ आदाबे, घुगेसर,मनोहर पायघन आदी जण उपस्थीत होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड सामाजीक संघटनेचा पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले..

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close