Breaking News

*मेघा देशमुख झरीकर यांना दूरदर्शनचा सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

मुंबई, दि. 3 : 12 व्या दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान 2019 च्या पुरस्कारांची घोषणा राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज मंत्रालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात केली. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, तज्ञ, संस्था यांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो. येत्या दि. 03 जुलै 2019 रोजी, सायंकाळी 6 वाजता मुंबई दूरदर्शन येथे या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास आमदार प्रसाद लाड, दूरदर्शनचे अपर महासंचालक एम. एस. थॉमस, उपसंचालक नंदन पवार, सहायक संचालक जयू भाटकर, जावेद शेख आदी यावेळी उपस्थित होते.

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी महिला शेतकरी (Excellent Work Women farmer in Agriculture) : श्रीमती मेघा विलासराव देशमुख, मु.पो.झरी, ता.जि. परभणी..

नंदकुमार वाघमारे
सहायक संचालक (माहिती)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, मुंबई

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close