बोर्डीकर सन्मानाची वागणूक देत नाही भाजपा तालुका कार्यकरणी चा आरोप नवीन कार्यकारणी संदर्भात मुख्यमंत्रीना भेटणार

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर :- जुन्या निष्ठावान करकर्त्यांना मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या भाजपा प्रवेशा पासूनच तालुक्यातील पदधिकरी
यांना कुठल्याही प्रक्रियत सामावून घेत नाही व सन्मानाची वागणूक देत नाही असा आरोप जिंतूर तालुक्यातील भाजपा तालूका कार्यकारणी ने आज दि.17 जून रोजी एक पत्रकार परिषदेत केला
नुकत्याच जिंतूर कृषि उत्पन्न समेतीवर नियुक्त केलेल्या प्रशासक व इतर संचालका मध्ये एक ही भाजपा च्या जुन्या कार्यकरता व पद अधिकारी ला सामावून घेण्यात आले नाहि त्यांच्याच जुन्या कार्यकर्ते ला स्थान देण्यात आले ज्यांना हि पदे देण्यात आली ते तर पक्षाचे सदस्य सुद्धा नाहि असा आरोप त्यांनी केला या सर्व नवीन नियुक्त्याना जिंतूर भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला असून संप्रकमंत्री ना.बबनराव लोणीकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहोत व सदरील नियकत्या तात्काळ रद्द करण्याची मागणी करणार आहोत असे या वेळी पत्रकार परिषेदेत सांगण्यात आले
या वेळी भाजपा चे किसान मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष खंडेराव आघाव,तालुका अध्यक्ष विलास गीते,शहर अध्यक्ष राजेश वटमवार, प्रदीप फाले,सुयोग्य मुंढे, राजेश कडे, नागेश अकात, किशोर जाधव, शाम पवार,कुबेर हुलगुंडे, मुसा कुरेशी, सौ. गंगूबाई देशमुख, आदी उपस्थित होते