*जिंतूरात वासवी माता व श्री रंगनाथ महाराज या दोन बचत गटाची स्थापना*
संपादक :- अकबरसिद्दीकी
जिंतूर
जिंतूर शहरातील आर्य वैश्य समाज युवकांची श्री नगरेश्वर मंदिर येथे बैठक होऊन त्या बैठकीत दोन बचत गटाची स्थापना करण्यात आली मार्गदर्शन करण्यासाठी आर्य वैश्य युथ महाराष्ट्र अध्यक्ष श्री सूर्यकांत कोकड परभणी हे आवर्जून उपस्थित होते
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अशोक चिद्रवार होते
श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या प्रतिमा पूजाने बैठक सुरू झाली
बचत गटाच्या माध्यमातून समाज संघटन समाज प्रबोधन व समाजातील गरजवंताला योग्य वेळी आर्थिक मदत होण्यासाठी बचत गट स्थापन करणे कसे योग्य व फायद्याचे आहे याचे सखोल मार्गदर्शन श्री सूर्यकांत कोकड यांनी केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत
बचत गट स्थापन करण्याचा उद्देशाने स्थापन घेण्यात आलेल्या बैठकीत वासवी माता बचत गट जिंतूर व श्री रंगनाथ महाराज बचत गट जिंतूर या नावाने दोन बचत गट स्थापन करण्यात आले
या बचत गटाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्याचे ठरविण्यात आले बचत गट प्रमुख म्हणून स्वप्नील येरमवार व शंकर चिद्रवार यांची निवड झाली या वेळी
मार्गदर्शक म्हणून
मा सूर्यकांत कोकड परभणी
मा संतोष गुंडाळे परभणी उपस्थित होते
कार्यक्रम अध्यक्ष
मा अशोक चिद्रवार हजर होते व्यासपीठावर
मा सुनिल वट्टमवार
मा प्रदिप कोकडवार
यांची उपस्थिती होती
संचलन व आभार स्वप्नील येरमवार यांनी मानले बैठकीत समाजातील सर्व युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते