Breaking News

लातुरच्या सेवालयाला २,४०,००० रुपयाची मदत .

 

संपादक :- अकबर सिद्दीकी

परभणी :-    लातुर सेवालय येथे रवी बापटले यांच्या सेवालयात एकुण ८०
HIV ग्रस्त अनाथ,निराधार मुलांचे पालण पोषण केले जाते.हे सेवालय संपुर्णत: लोकसहभागातुन चालवले जाते.शासकिय स्तरावरुन कोणतीही मदत येथे मदत स्वीकारल जात नाही.
आज हे सेवालय स्वावलंबी होण्याच्या मार्गावर आहे.सेवालयाच्या शेतीतुन विविध उत्पादन काढले जात आहेत.
सेवालयातील विद्यार्थ्यीं उत्कृष्ट असा आॅरकेस्ट्रा सादर करुन मदत जमा करुन स्वावलंबी होऊ पाहत आहेत.

कृषीभुषण कांतराव झरीकर यांच्या पुढाकारातुन बी.रघुनाथ परभणी येथे या मुलांच्या आॅरकेस्ट्रा शोचे आयोजन केले होते.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना रवी बापटले यांनी सांगितले कि,
सेवालयाच्या उभारणीत कांतराव झरीकर यांचे खुप मोठे योगदान राहिले आहे. परभणीकरांनी मला सातत्याने आधार दिला आहे त्यामुळे मी परभणीकरांचा कृतज्ञ आहे.
सेवालयातील मुलांनी आॅरकेस्ट्राच्या माध्यमातुन सादर केलेल्या त्यांच्या लोकप्रबोधन कलेला परभणीकरांना उत्स्फुर्ततेने प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात कृषीभुषन कांतराव झरीकर यांनी परभणीकरांच्या वतीने २,४०,००० रुपयाची मदत रवी बापटले यांना दिली.
कार्यक्रमाचे प्रस्तावीक व आभार कांतराव झरीकर तर सुत्रसंचल प्रा.सुभाष ढगे यांनी केले.
संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनकडुन रवी बापटले यांचा त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, प्रा सुभाष ढगे,विलास पानखेडे,मेघा देशमुख,नवरचना प्रतिष्ठानचे प्रा.मोरे सर,बाळासाहेब फुलारी,गोपाल मुंदडा,कपिल खैराजानी विद्याताई पवार, नायक सर,कल्याण देशमुख, विलास साखरे,प्रभाकर कानकुडकेवाड,अमित सोळंके,श्यामसुंदर निरस यांनी परिश्रम घेतले.
एक सण HIV ग्रस्त अनाथ विद्यार्थ्यांच्या आनंदी जीवनासाठी घालवल्याचे समाधान परभणीकरांच्या चेहर्यावर दिसुन येत होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close