Breaking News

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे जिंतूर मध्ये जाहीर सभेचे आयोजन.

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

      संपादक :- अकबर सिद्दीकी

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे जिंतूर मध्ये जाहीर सभेचे आयोजन.

मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब , छत्रपती खा.उदयनराजे भोसले साहेब विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब व खा.अमोल कोल्हे साहेबयांची प्रमुख उपस्थिती.*

जिंतूर- जिंतूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा दि. २२ ऑगस्ट वार गुरुवार सकाळी ११ वा. जिल्हा परिषद मैदान जिंतूर येथे शिवस्वराज्य यात्रेनिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी मान. श्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, छत्रपती खा. श्री उदयनराजे भोसले, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब, खा.अमोल कोल्हे साहेब, फौजिया खान, आ. बाबाजानी दुर्रानी, आ.मधुसूदन केंद्रे , राजेश विटेकर , जी.प.अध्यक्षा सौ.उज्ज्वलाताई राठोड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राज्यातील सत्तेचे राजकीय व सामाजिक परिस्थिती त्यात शिवस्मारक व बाबसाहेब आंबेडकरस्मारक, शेतकरी आत्महत्या , फसवी कर्जमाफी, दुष्काळ होरपळ ,शिक्षणाचा बोजवारा ,धनगर आरक्षण , मुस्लीम आरक्षण, व लिंगायत आरक्षण ,पूर परिस्थिती हाताळण्यात अपयशी सरकार आदी विषयावर सरकारची पोलखोल करण्यासाठी सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी जनतेने मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन आ.विजय भांबळे यांनी आवाहन केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close