शेवटच्या श्वासा पर्यंत शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता म्हणूनच राहणार…. आ. विजय भांबळे जिंतूर मधील शिवस्वराज्य यात्रेस जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद.

संपादक :- अकबर सिद्दीकी
जिंतूर- ( दि. २२ ऑंगस्ट ) जिंतूर येथे शिवस्वराज्य यात्रे निम्मित्त झालेल्या जाहीर सभेत मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.या सभेसाठी मान. श्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब , विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेब, खा.अमोल कोल्हे साहेब, अमोल मिटकरी(प्रदेश सरचिटणीस रा.कॉंग्रेस) फौजिया खान, आ. बाबाजानी दुर्रानी, राजेश विटेकर , जि.प.अध्यक्षा सौ.उज्ज्वलाताई राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना राज्य सरकारवर सडकून टीका केली. त्यात सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन फसवी कर्जमाफी केली आहे ,कर्जमाफ करण्यास तीन तीन वर्ष कुठे लागत असतात का? आस सवाल यावेळी अजित दादा पवार साहेब यांनी उपस्थित केला. आमचे सरकार आल्यास पहिल्या तीन महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून दाखऊ तसेच राज्या मध्ये सर्व सरकारी रीक्त पदे तात्काळ भरून राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन अजित दादा पवार यांनी दिले.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी राज्यातील काही भागातील विदारक दुष्काळ तर काही भागात उद्भवलेली दुर्दैवी पूरपरिस्थिती हे नाकरत्या सरकारचे अपयश आहे,या भ्रष्ट सरकारमध्ये सोळा भ्रष्ट मंत्र्यांची पुरव्यानिशी यादी देतो त्यांची चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यामध्ये धमक आहे का अशा शब्दात सरकार वर चौफेर टीका केली.
तर मा. खा. अमोलजी कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन होऊन इतके दिवस झाले असून एक इंचही काम झाले नाही हा महामानवांचा अपमान नाही का, हे जनतेच्या निदर्शनास आणून दिले.
प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी अखंड महाराष्ट्रात अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गाविन्दाने नांदत आले असून या भाजप शिवसेनेच्या काळात जातीजातीत तेढ निर्माण करून भीतीचे वातावरण निर्माण केले आहे, व राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीच्या काळात राम मंदिराचा उलेख करून तरुणांची माथी भडकवण्याचा काम ह्या लोकांकडून नेहमीच केले जाते. अमोलजी मिटकरी यांनी माझे मत असे म्हणताच जनतेने उत्स्फुर्तपणे विजय परत असा जयघोष करत आ. विजय भांबळे यांच्या कामाची पावती दिली.
आ. विजय भांबळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात गेल्या पंचवीस वर्षातील तालुक्याची झालेली दुरवस्था व माझ्या कार्यकाळातील पाच वर्षतील विकास वीज, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व माजी आमदारांच्या गावातील रस्ता देखील मीच पूर्ण केला आहे हे छातीठोकपणे सांगू शकतो, माझ्या विरोधात नेहमीच तालुक्यातील सर्व विरोधक एक असतात, तरी जनताजनार्धन माझ्या पाठीशी उभी आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला. व माझ्या पक्षांतराच्या चर्चा विरोधकांनी सुरु केल्या असल्या तरी मी श्वासात श्वास असे पर्यंत मी शरद पवार साहेबांचाच कार्यकर्ता राहील अशी ग्वाही दिली.
प्रदेश सरचिटणीस नानासाहेब राउत यांनी आ. विजय भांबळे यांच्या वतीने सर्व उपस्थित जनतेचे आभार मानले. यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी,जि.प. सदस्य,प.स. सदस्य, न.प. सदस्य,सरपंच यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.