Breaking News

*तीन तलाक विरुद्ध जिंतूरात गुन्हा दाखल * पैशांची पूर्तता न केल्यामुळे विवाहितेस तलाक * सासरची मंडळी जिंतूर पोलिसांच्या रडारवर,

संपादक :-अकबर सिद्दीकी

जिंतूर :-   जिंतूर शहरातील मौलाना आझाद कॉलोनी येथील 25 वर्षीय विवाहिता सासरच्या मंडळीने मागणी केलेल्या 5 लाख रु देऊन अजून 5 लाख रुपयांची पूर्तता करण्यात असमर्थ ठरत असल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेस शारीरिक व मानसिक त्रास देत विवाहितेस बेकायदेशीर तीन तलाक देऊन घरातून काढून दिल्या प्रकरणी बुधवार 18 सप्टेंबर रोजी जिंतूर पोलिसात सासरच्या 12 जणांविरुद्ध तीन तलाक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिंतूर पोलिसात प्रथमच दाखल झालेल्या तीन तलाकविरुद्ध गुन्हा प्रकारणाविषयी सविस्तर वृत्त असे की, शहरातील मौलाना आझाद कॉलोनीमधील 25 वर्षीय इशरत बेगम शेख अहेमद हिचा विवाह पूर्णा येथील सख्या मावशीचा मुलगा शेख अहमद शेख अफसर यांच्यासोबत 2015 साली मुस्लिम धर्माच्या रितीरिवाज प्रमाणे झाला होता. लग्नाच्या तीन वर्षांपर्यंत पती व सासरच्या मंडळीने चांगल्या प्रकारे नांदविले मात्र पूर्ण कुटुंबाचा व्यवसाय एकच असल्याने पतीला स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये घेऊन येण्यासाठी सासूने पती मार्फत शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच सासू, नणंद आणि दीर यांच्याकडून नेहमी मुलंबाळं होत नसल्याचे कारण समोर करून मारहाण केली जात असल्याने सदरील प्रकार विवाहितेने भाऊ व आईवडील यांना सांगितल्यानंतर भाऊ व आईवडील यांनी सासू यांच्या समक्ष पती व सासऱ्याला 5 लाख रुपये हॉटेल व्यवसायकरिता दिले. मात्र तरीही पती, नणंद, सासू, दीर यांनी शारीरिक व मानसिक छड करत असंख्य वेळा उपाशी पोटी ठेवले. शेवटी आईवडिलांनी मुलं बाळ होत नसल्याने जावई व मुलीला परभणी येथील खाजगी रुग्णालयात दोघांची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणी विवाहितेत दोष नसल्याचे निष्पन्न झाले. तरीही सासरच्या मंडळीने तुला मुलंबाळं होत नाही तू आमच्या कामाची नाही तू तुझ्या पतीला सुडून दे म्हणून त्रास देने सुरूच ठेवले. म्हणून विवाहिता काही दिवसाकरिता माहेरी आल्यामुळे सासरच्या मंडळीने विवाहितेला न विचारता पतीचे दुसरे लग्न लावून दिले. सदरील बाब समजल्यानंतर विवाहिता व आई शहानिशा करण्यासाठी पूर्णा येथे गेले असता पतीने विवाहितेस बेकायदेशीर रित्या तीन तलाक देऊन उखळत्या गरम पाण्यात दोन्ही हात टाकले. यात विवाहितेचे दोन्ही हात गंभीरपणे भाजले. या प्रकरणी विवाहिता शेख इशरत हिच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलिसात सासू शेख तस्लिम, सासरा शेख अफसर, पती शेख अहमद, नणंद शेख अफरीन, शेख यास्मिन, शेख अमरीन, शेख नाजमीन, दीर शेख अफरोज, शेख अजहर, जाऊ सलमा शेख, सवत शेख समरीन, सवतीचा भाऊ शेख मुखीद अशा सासरच्या 12 जणांविरुद्ध एकाच वेळी तीन तलाक देने कलम मुस्लिम महिला वटहुकूम 2018 कलम 4 , भारतीय दंड संहिता 498 (अ) 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार अशोक हिंगे हे करत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close