Breaking News

*गांधी जयंती निमित्त लायन्स क्लब चे स्वच्छता अभियान*

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

 

*गंगाखेड (प्रतिनिधी)*
2 ऑक्टोबर 150 व्या गांधी जयंती निमित्त  गंगाखेड टाउन व रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता अभियान तसेच जनजागृती रॅली, प्लास्टिक मुक्त गंगाखेड असे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले .याप्रसंगी सर्वप्रथम सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान रेल्वे स्थानका वरील मुख्य प्लॅटफॉर्म तसेच स्थानकासमोरील सर्व परिसर लायन्स क्लब गंगाखेड टाऊनचे सदस्य, पदाधिकारी व रेल्वे प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून स्वच्छ केला व महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंतीदिनी हीच श्रद्धांजली आहे असे म्हणत स्वच्छतेचा संदेश दिला. यानंतर रेल्वे स्थानक ते भगवती चौक, दिलकश चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोटरसायकल रॅली काढून स्वच्छता ही सेवा, महात्मा गांधी की जय, स्वच्छता अभियान काळाची गरज, प्लास्टिक मुक्त गंगाखेड ,अशा घोषणा देत संपूर्ण गंगाखेड शहर दणाणून सोडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमासाठी लायन्स क्लब गंगाखेड टाऊनचे अध्यक्ष रामेश्वर तापडिया तर प्रमुख पाहुणे म्हणून मुद्दाम हून उपस्थित झालेले रेल्वेचे नांदेड विभागाचे असिस्टंट सिक्युरिटी कमिशनर ए.सी. मिर्धा, ए.एस.आय. बाहुले, स्टेशन मास्टर कुमार राजेश सिंह, कॉन्स्टेबल रघुनाथ तिडके, डी.एस. पठाण, विलास डोंगरे तर लायन्स क्लबचे सचिव बालाजी कांदे ,झोनल चेअर पर्सन बालाजी ढाकणे ,पत्रकार संजय सुपेकर, योग शिक्षक गोपाळ मंत्री, कॅबिनेट ऑफिसर केशव देशमुख, लॉयन सदस्य संभाजी वाडेवाले, अतुल गंजेवार, मुकुंद चक्रवार, महादेव गीते, पी.आर. सुर्वे,प्रा. दीनानाथ फुलवाडकर, प्रशांत मुंडे,प्रा. इंगोले, संजय धारे, ज्ञानेश्वर गुंडाळे ,संतोष गुंडाळे, विकास गुंडाळे, प्रा. सोन्नर,माळवे, पांचाळ आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close