Breaking News

आज आ.विजय भांबळे दाखल करणार आपला उमेदवारी आर्ज” नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- आ.विजय भांबळे

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :-अकबर सिद्दीकी

 

जिंतूर:-जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघातून आघाडीचे उमेदवार म्हणून आ.विजय भांबळे आज आपला उमेदवारी आर्ज मान्यवरांच्या उपस्थितीत दि.०४ ऑक्टॉबर रोजी दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस (आय), आर पी आय (कवाडे गट), स्वाभिमानी शेतकरी संघटना, चे उमेदवार म्हणून आ.विजय भांबळे आपला उमेदवारी आर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार रामराव वडकुते,माजी राज्यमंत्री फौजिया खान, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.उज्वलाताई विश्वनाथ राठोड, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती मारोती पहेलवान इ. मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.

दि.४ ऑक्टॉबर रोजी सकाळी ठीक १० वाजता आ.विजय भांबळे यांच्या घरापासून ते दादा शरीफ चौक, मेन चौक, पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील अशी भव्य रॅलीसह उमेदवारी आर्ज दाखल करून जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सभेस संबोधित करणार आहेत.

आ.विजय भांबळे हे मतदार संघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर दुसऱ्यांदा निवडणुकीस एक सुशिक्षित उमेदवार व मतदार संघात त्यांना जनतेचा वाढता पाठींबा, राजकारणावर मजबूत पकड, कार्यकर्त्यांची मजबूत फळी यासह सामान्य जनतेत दांडगा संपर्क, नागरिकांच्या आडी-आडचणीनची जाण या मुद्यावर जनतेसमोर जाणार आहेत.तर जिल्हा परिषद, जिंतूर, सेलू पंचायत समिती व ७० % पेक्षा जास्त ग्रामपंच्यायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व असून आ.विजय भांबळे सर्व सामन्यांचे लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात.

तरी आघाडीचे सर्व पदाधिकारी, पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ.विजय भांबळे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close