Breaking News

“जोरदार शक्तीप्रदर्शन करत आ.विजय भांबळे यांनी उमेदवारी आर्ज केला दाखल” **एक आरोप सिद्ध करून दाखवावला तर मी भर चौकात फाशी घेईल, आ.भांबळे

[responsivevoice_button voice="Hindi Female"]

संपादक :- अकबर सिद्दीकी

जिंतूर:-जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघातून आघाडीचे उमेदवार म्हणून आ.विजय भांबळे यांनी आपला उमेदवारी आर्ज जोरदार शक्तीप्रदर्शन करत दि.४ अकटोबर रोजी जिंतूर केशव निवास येथून प्रंचड भव्य रॅली काढून हजोराच्या उपस्थितीत जिंतूर मधील मुख्य रस्त्याने जात महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक या महामानवांच्या पुतळ्यास हार अर्पण करून सदर रॅलीचे रूपांतरण जिल्हा परिषद मैदानावर सभेत झाले.
या वेळी आपल्यावरच्या आरोपाचे खंडन करत आ.भांबळे म्हणाले की आज हे लोक माझ्यावर टीका करत आहेत त्यांनी माझ्यावरचा एक आरोप सिद्ध करून दाखवावला तर मी भर चौकात फाशी घेईल, नाहीतर यांनी तरी घ्यावी. दिवसरात्र मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांचा पीक विमा खाणाऱ्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये असे आवाहन मी आज जिंतूर येथे झालेल्या प्रचंड जाहीर सभेत केले.

पर्वा पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली. मी गेलो नव्हतो तिकीट घरी आलं आणि आमच्या विरोधकांना पाच वर्षात तीन पक्ष बदलावं लागले तरी अजून पक्ष व निवडणूक चिन्हाचा मेळ लागला नाही. मागच्या पंचवीस वर्षात अनेक घोटाळ्यांच्या बाजार करून मतदारसंघातील गोर-गरीब जनतेला लुटण्याचे काम ह्यांनी केल, त्याचे हे भोग आहेत.
आपल्या भगिनी माझ्या विरोधात अर्ज दाखल करून निवडणूक लढवणार आहेत. माजी आमदार परभणीला तर ह्या पुण्याला राहतात तिथं राहून जिंतूर-सेलूच्या
खेड्यापाड्यातील सामान्य लोकांच्या अडचणी त्यांना कशा कळणार. मी १२ महिने २४ तास मतदारसंघात उपलब्ध आहे. २४ तासात कधीही कुठलीही अडचण असू द्या, मी माझ्या माणसांसाठी एका हाकेच्या अंतरावर आहे. रात्री १ वाजता मला फोन करून अडचण सांगितली तरी मी धावून येतो हे मतदारसंघातील जनतेनं अनुभवलंय.

परभणीचे खासदार इथं येऊन माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, की परभणी-जिंतूर रस्त्याचे काम कश्यामुळे थांबले होते? दत्तक घेतलेल्या आपल्या केहाळ गावाचा ज्यांना विकास करता आला नाही, हफ्ते खाणाऱ्या लोकांचे सगळे पराक्रम लोकांना माहीत आहेत. जिंतूरला येऊन आम्हाला शिकवू नका, हफ्ते अन वसुल्या बंद करा, लोकांची काम करा.
आ. विजय भांबळे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. व पाच वर्षात कधीही जिंतूर सोडून बाहेरगावी राहण्यास गेलो नाही, मी 24 तास आपल्या सेवेत असतो व यापुढेहि जनतेची सेवा करण्याची संधी मला द्यावी त्यासाठी घड्याळाच्या समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करावे अशी विनंती उपस्थित जनसमुदायाला केली.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close